[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
व्हिटॅमिन ई
व्हिटॅमिन ईने डोळ्यांची दृष्टी स्वच्छ आणि साफ होण्यास मदत होते. निरोगी आहारामुळे डोळ्यांची नजर तेज होण्यास मदत होते. एवढेच नव्हे तर शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच डोळ्यांनाही योग्य पोषण मिळणे आवश्यक आहे.
कॅल्शियम
चिझ, दूध, दही, काबुळी चणे, राजमा, सोयाबिन, बदाम, गव्हाचे दाणे, अंडी, अक्रोड यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. या पदार्थांमुळे नजर चांगली होण्यास मदत होते. तसेच ज्वारी, बाजरी, नाचणी, ओट्स या पदार्थांमुळे डोळ्यांची दृष्टी चांगली होण्यास मदत होते.
व्हिटॅमिन बी २
बदाम, मोड आलेली कडधाने, सोयाबिन, पनीर, सगळ्या डाळी, पालक आणि ब्रोकोली यासाख्या पदार्थांमुळे डोळ्याची नजर चांगली होते.
व्हिटॅमिन ए
नैसर्गिकरित्या तुम्ही आहारात व्हिटॅमिन एचा समावेश करू शकता. जसे की, कोथिंबिरीचा ज्यूस. याकरता एक ग्लासभर ज्यूस त्यामधे मीठ आणि चवीकरता लिंबू पिळावा. गाळून हा ज्यूस घेतल्याने नजर चांगली होते. तसेच गाजर ज्यूस, मेथी, पालक, सरसो का साग, पिवळा बलक, मटण लिव्हर. तसेच लाल आणि पिवळ्या रंगाची फळे, भाज्या जसे की, रताळे, आंबा, पपई, भोपळा, चिझ, चेरी, दूध, क्रिम, कलिंगड यासारख्या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन ए आहे.
[ad_2]