हात पकडला, मग KISS केलं.., रोड रोमिओच्या कृत्यानंतर बहिणींनी घडवली अद्दल, VIDEO VIRAL

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Viral Video : देशभरात मुलींच्या छेडछाडीच्या घटन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोशल मीडियावर एका धक्कादायक व्हिडीओने यूजर्सची झोप उडवली आहे. या व्हिडीओमधील नराधमाने जे कृत्य केलं आहे ते पाहून तळमस्तकातील आग डोक्यात जाते. या व्हिडीओमध्ये रोड रोमिओच्या कृत्या कंटाळून या दोन मुलींनी कायदा हातात घेतला. दोन बहिणींनी मिळून छेडछाड करणाऱ्या नराधमाला आयुष्यभराची अद्दल घडवली आहे. 

हात पकडला, मग KISS केलं..,

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती तोंडावर हात ठेवून रस्त्यावर खाली पडला आहे. तर एक शाळकरी मुलगी हातात बेल्ट घेऊन त्याला धो धो धोपटतेय. ती मुलगी त्या व्यक्तीला गुजरातमध्ये शिवीगाळ करताना दिसतेय. (Trending video Teenage Sisters Beat Molester Ahmedabad viral video on Social media today Google trend )

मिळालेल्या माहितीनुसार या व्यक्ती त्या दोन बहिणींची रस्त्यावरुन येता जाता छेड काढत होता. या छळाला कंटाळून अखेर त्यांनी कायदा हातात घेत त्या तरुणाला बेल्ट आणि लाथाने रस्त्यावरच तुडवले. 

ही घटना गुजरातमधील अहमदाबादमधील आहे. या नराधमाविरोधात या शाळेकरी मुली आणि त्यांचा पालकांनी कागदपीठ पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवली आहे. मुलीच्या आईचं म्हणं आहे की, तो नराधम मुलींची दररोज छेड काढत होता. घटनेच्या दिवशी सकाळी धाकटी मुलगी सायकलवरुन शाळेत जात असताना नराधमाने तिला गाठवलं आणि गिफ्ट देत होता. 

मुलीने त्याला भेटवस्तू घेण्यास नकार दिला. तर त्या व्यक्तीने ते गिफ्ट तिच्या बॅगेत ठेवले आणि तिचा हात पकडून तिला किस केलं. या धक्कादायक घटनेनंतर ती घरी आली खूप रडू लागली. 

त्या पुढे म्हणाल्या की, त्या घटनेनंतर शुक्रवारी पुन्हा एकदा त्याने तिचा रस्ता अडवून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर माझी मोठी मुलगी घटनास्थळी आली आणि त्या दोघींनी मिळवून त्याला बेल्टने प्रसाद दिला. 

 

दरम्यान हा घटनेचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर sanjana या महिलेच्या अधिकृत्य अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरतोय.

Related posts