( प्रगत भारत । pragatbharat.com)
Bride Run Away With Boyfriend: लग्न ठरले, नवरदेव लग्नाची (Wedding) वरात घेऊन नवरीच्या (Bride) घरी आला. नववधूच्या वडिलांनी मोठ्या उत्साहात नवरदेवाचे स्वागत केले. लग्नाचा मुहूर्त जवळ येतान भटजींनी वधु-वरांना बोलवले, नवरदेव हातात हार घेऊन आपल्या वधुची वाट पाहत होता. मात्र, मुहूर्त टळून जात होता तरीही ती येण्याची काही चिन्हे दिसेना. त्याचवेळी कोणीतरी नववधू तिच्या प्रियकरासोबत (Boyfriend) फरार झाल्याची माहिती दिली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. झालेल्या अपमानाने नवरदेवाने (Groom) संतप्त पाऊल उचललं आहे. (Bride Run Away With Boyfried On Wedding Day)
मांडवातून नवरी फरार
उत्तर प्रदेशमधील रायबरेली जिल्ह्यात ही घटना घडली आहे. लग्नाला काही वेळच शिल्लक असताना नववधू तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. वधूच्या कुटुंबीयांनी शोध घेऊनही ती कुठेच सापडली नाही. नववधू सापडत नसल्याची माहिती नवरदेवाला कळाली. भरमांडवात अपमान झाल्याने नवरदेव व वर पक्ष रागातच तिथून निघुन गेले.
वरात माघारी गेली
लग्न न लागताच वरात परत आल्याने गावात एकच चर्चा रंगली होती. यामुळं व्यथित झालेल्या नवरदेवाने रागाच्या भरात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांना कळताच त्यांनी तरुणाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तरुणाची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. तिथे तरुणाची मृत्यूशी झुंज सुरू आहे.
प्रियकराचा हात धरुन पळून गेली
दरम्यान, आसानंदपूर येथे राहणाऱ्या रामनरेश यांच्या मुलीचे बुधवारी लग्न होणार होते. मात्र, लग्नाच्याच दिवशी नवरी तिचा प्रियकर मुन्नासोबत फरार झाली. नवरीच पळून गेल्याने मांडवात एकच गोंधळ उडाला. तर, वरपक्षाने वधुच्या कुटुंबियांना धारेवर धरलं. या सगळ्या घटनेनंतर नवरीच्या घरच्यांनी फरार झाल्याची तक्रार नोंदवली.
अखेर पोलिसांना पडावं लागलं मध्ये
पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी दोन्ही पक्षातील कुटुंबीयांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, लग्नाच्या दिवशी नवरीचा काहीच पत्ता नसल्याने नवरदेव अजय संतप्त होऊन मांडवातून निघून गेला. 28 जून रोजी ही घटना घडली असून पोलिसांनी मुन्नाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
अपमान झाल्यामुळं टोकाचे पाऊल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरीच्या इच्छेविरोधात तिचे लग्न ठरवले जात होते. म्हणूनच ती घरातून पळून गेली. तर, यामुळं सगळ्यांनी नवरदेवाचा चेष्टा केल्याने अपमानित होऊन त्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वधूला शोधून काढले असून तिच्या घरच्यांच्या ताब्यात दिले आहे. तर, तिचा प्रियकर मुन्ना याचा शोध घेण्यात येत आहे.