Chia Seeds Benefits For Weight Loss Digestion And Control Blood Sugar 7 Amazing Health Benefits; सकाळीच उपाशीपोटी प्या या काळ्या दाण्याचे पाणी, पोट होईल साफ आणि मिळतील ७ जबरदस्त फायदे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

उच्च रक्तदाबावर नियंत्रण

उच्च रक्तदाबावर नियंत्रण

Chia Seeds Useful For High Blood Pressure: हेल्थलाईन डॉट कॉमने दिलेल्या एका अहवालानुसार, ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांनी नियमित पाण्यात चिया सीड्स घालून सेवन करावे. यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत मिळते. चिया सीड्समध्ये असणारे क्लोरोजेनिक अ‍ॅसिड नामक अँटीऑक्सिडंट घटक उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळविण्यास मदत करतो.

इन्फ्लेशनची समस्या होईल कमी

इन्फ्लेशनची समस्या होईल कमी

सकाळी उपाशीपोटी चिया सीड्सचे पाणी पिण्याने शरीरावर सूज कमी होण्यास मदत मिळते. Chia Seeds मध्ये कॅफीक अ‍ॅसिड अँटीऑक्सिडंट असते, जे अँटीइन्फ्लेमेटरीवर परिणामकारक ठरते. तुम्हाला इन्फ्लेमेशन, सूज येण्याची समस्या होत असेल तर चिया सीड्सच्या पाण्याचा दैनंदिन आयुष्यात नक्की समावेश करून घ्यावा.

(वाचा – गव्हाचे नाही तर वजन कमी करण्यासाठी हे पीठ ठरते अधिक उपयुक्त, महिनाभरात होईल झर्रकन Weight Loss)

हृदयाच्या आरोग्यासाठी गुणकारी

हृदयाच्या आरोग्यासाठी गुणकारी

तुम्ही तुमचे हृदय अधिक काळ निरोगी ठेऊ इच्छित असाल तर चिया सीड्सचे पाणी यावर उपयुक्त ठरते. फायबरने युक्त असणारे चिया सीड्समध्ये अल्फा लिनोलेनिक नावाचे ओमेगा – ३ फॅटी अ‍ॅसिड आढळते, जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.

(वाचा – युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढली आहे कसे समजेल? काय कराल सोपा उपाय)

ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी

ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी

WebMD ने शोधलेल्या अहवालानुसार, चिया सीड्सच्या हेल्दी बिया ब्लड ग्लुकोज लेव्हल मॅनेज करण्यासाठी मदत करतात. तुम्हाला डायबिटीस असेल तर चिया सीड्सचे हेल्दी ड्रिंक नियमित प्यावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार याचे सेवन करावे.

(वाचा – पावसाळ्यात सकाळी उठताच प्या आयुर्वेदिक चहा, आजार राहतील दूर)

त्वचेसाठी उत्तम

त्वचेसाठी उत्तम

चिया सीड्समध्ये आढळणारे फॅटी अ‍ॅसिड हे निस्तेज, कोरड्या आणि त्रासदायक त्वचेला पुन्हा निरोगी आणि कोमल बनविण्यासाठी मदत करतात. चिया सीड्सचे पाणी पिण्याने त्वचा हायड्रेट राखण्यास मदत मिळते. त्वचेचा फायदा मिळतो की नाही यावर अजून अभ्यास चालू असून शोधही चालू आहे.

वजन कमी करण्यासाठी

वजन कमी करण्यासाठी

चिया सीड्समध्ये अधिक प्रमाणात फायबर असून पाण्यात मिक्स करून पिण्याने वजन कमी होण्यास फायदा मिळतो. पाण्यातून चिया सीड्स खाल्ल्याने पोट अधिक काळ भरलेले राहाते, ज्यामुळे लवकर लवकर भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. यामुळे अन्नपदार्थ खाण्याची गती कमी होते आणि कमी कॅलरी पोटात जाते. त्वरीत वजन कमी करायचे असल्यास याचा फायदा होतो.

पचनक्रिया राहाते तंदुरुस्त

पचनक्रिया राहाते तंदुरुस्त

चिया सीड्समध्ये भरपूर फायबर असून सकाळी उपाशीपोटी याचे सेवन केल्यास, पचनक्रिया अधिक मजबूत राहण्यास मदत मिळते. तसंच मलत्याग होण्यास त्रास होत नाही.

बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर चिया सीड्सचा नक्की उपयोग करावा. रोज रात्री पाण्यात चिया सीड्स भिजवा आणि सकाळी उठून उपाशीपोटी याचे सेवन करावे. वजन कमी करायचे असेल तर पोटात अन्नाचे पचन होणे ही सर्वात पहिली पायरी आहे.

[ad_2]

Related posts