लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच पत्नीला धक्का, पतीने पॉर्नस्टारसारखे कपडे घालायला लावले अन् नंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Crime News: लग्न म्हटलं तर प्रत्येक मुलीने आपल्या जोडीदारासंबंधी स्वप्नं रंगवलेली असतात. आपल्या जोडीदारासह तिने भावी आयुष्याच्या काही योजना आखलेल्या असतात. पण अनेकदा लग्न झाल्यानंतर आपली स्वप्नं धुळीस मिळतात. पण तरीही संसाराचा गाडा खेचण्याचा प्रयत्न केला जातो. पण काही प्रकरणांमध्ये हा धक्का इतका मोठा असतो की स्वप्नांचा चुराडाच होतो. असंच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच पती आपल्याला पॉर्नस्टारखं वागायला लावत असल्याने पत्नीच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यामुळे या नवविवाहित तरुणीला मेहंदी सुकण्याआधीच पोलीस ठाण्यात धाव घ्यावी लागली. 

राजधानी दिल्लीतील शाहदरा येथील 30 वर्षीय तरुणीने आपल्या पतीवर अनैसर्गिक शारिरीक संबंध स्थापित केल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर आपल्या पतीला पॉर्न पाहण्याचं व्यसन असल्याचं तिने सांगितलं आहे. लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच त्याने आपला शारिरीक छळ सुरु केल्याचा तिचा आरोप आहे. 

पूर्व रोहताश येथील निवासी असणाऱ्या या तरुणीने तक्रारीत तिने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या पतीला पॉर्नचं इतकं व्यसन आहे की तो माझ्यावर त्याच्या आवडत्या पॉर्नस्टारसारखं दिसण्यासाठी दबाव टाकत होता. तो मलाही पॉर्न पाहायला लावत होता. तसंच माझ्यावर पॉर्नस्टारसारखे कपडे घालण्याची जबरदस्ती करत होता. 

तरुणीने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी अनैसर्गिक संबंध ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 2020 मध्ये या जोडप्याचं लग्न झालं होतं. 

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तरुणीने तक्रारीत पतीच्या कुटुंबावरही आरोप केला आहे. पती आणि पतीचं कुटुंब माझ्याकडून हुंड्याची मागणी करत असून मानसिक णि शारिरीक छळ करत असल्याचा तिचा आरोप आहे. 

“मंगळवारी, भारतीय दंडाच्या कलम 498 अ (पती किंवा पतीच्या नातेवाईकांकून छळ) 406 (विश्वासाला तडा), 377 (अनैसर्गिक गुन्हा) आणि 34 (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या तक्रारीवरून शहादरा पोलिस ठाण्यात हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसाक गुन्हा दाखल केला आहे,” अशी माहिती पोलिस उपायुक्त (शहदरा) रोहित मीणा यांनी दिली आहे. याप्रकरणी तपास सध्या पहिल्या टप्प्यात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

“साक्षीदारांचे जबाब सध्या नोंदवले जात आहेत. डिजिटल तसंच इतर पुरावे गोळा करण्याचं काम सुरु आहे,” अशी माहिती रोहित मीणा यांनी दिली आहे. 

Related posts