Home Remedies For Constipation Immediate Relief Sabja Aka Basil Seeds How To Use It; शौचाला कडक होत असेल तर मलत्याग साफ होण्यासाठी काळ्या बी चा करा वापर, पोटातील घाण होईल साफ

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सब्जाच्या बी मधील गुणधर्म

सब्जाच्या बी मधील गुणधर्म

सब्जा अर्थात तुळशीचे बी. सब्जामध्ये फायबर अधिक प्रमाणात असल्याने पचनक्रिया नीट व्हायला मदत मिळते आणि त्यामुळे शौचाला त्रास होत असल्यास सकाळी साफ होते. पोटातील सर्व घाण बाहेर फेकण्यास यामुळे मदत मिळते.

याशिवाय पोट स्वच्छ झाल्याने वजन कमी झाल्यास वजन कमी करण्यास अधिक फायदा मिळतो. बद्धकोष्ठतेसाठी उपाय करून थकला असाल तर नक्की सब्जाचा वापर करून पाहा. प्रतिकारशक्ती वाढविण्यासही ठरते उपयुक्त.

पचनक्रियेत सुधारणा

पचनक्रियेत सुधारणा

अनेकदा सब्जाला चिया सीड्स समजण्यात येते. मात्र हे वेगळे असून तुळशीच्या बिया हे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. पचनक्रिया सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो. वजन कमी करण्यासाठी त्यामुळेच सब्जाचा वापर केला जातो. पचनक्रिया सुधारल्यामुळे वजनावर अधिक चांगला परिणाम होतो.

(वाचा – ६ तास झोपत नसाल तर व्यायामाचाही होणार नाही उपयोग, वेळीच व्हा सावध)

बद्धकोष्ठतेपासून सुटका

बद्धकोष्ठतेपासून सुटका

सब्जा शरारीसाठी नैसर्गिक डिटॉक्सचे काम करते आणि मलत्याग अधिक सोपेपणाने होण्यास मदत करते. एक ग्लास दुधात सब्जा मिक्स करा आणि काही दिवस रात्री झोपण्यापूर्वी याचे सेवन करा. सब्जाच्या बियांमध्ये असणारे तेल हे गॅस निकामी करून पोटदुखी बंद करते आणि कडक शौच होत असल्यास त्यावर फायदेशीर ठरते. फायबर अधिक प्रमाणात असल्यामुळे बद्धकोष्ठतेपासून सहजपणाने सुटका मिळते.

(वाचा – दातावर जमलेला पिवळा थर हटविण्यास मदत करेल घरगुती पेस्ट, आठड्यातून ३ वेळा वापर केल्याने मोत्यासारखे चमकतील)

वजन कमी करण्यासाठी परिणामकारक

वजन कमी करण्यासाठी परिणामकारक

सब्जातील फायबर तुमचे पोट अधिक काळ भरलेले राखण्यास मदत करतात. यामुळे लवकर भूक लागत नाही आणि वजन कमी करण्यास फायदा होतो. तसंच शरीरातील फॅट्स जाळून मेटाबॉलिजम अधिक वाढविण्यास मदत करते.

(वाचा – एग फ्रिझिंग करणे किती सुरक्षित? काय आहेत या प्रक्रियेचे टप्पे घ्या जाणून)

खोकला-सर्दीपासून ठेवते दूर

खोकला-सर्दीपासून ठेवते दूर

सर्दी – खोकला आणि दमा अशा त्रासांपासून दूर ठेवण्यासही सब्जाचा वापर करता येतो. सब्जामध्ये अँटीस्पास्मोडिक गुणधर्म असून अशा आजारांशी लढण्यास याचा फायदा होतो. त्यामुळे पावसाळा अथवा हिवाळ्यामध्ये तुम्ही याचा वापर करून घ्यावा.

ब्लड शुगर नियंत्रणात आणण्यासाठी

ब्लड शुगर नियंत्रणात आणण्यासाठी

बद्धकोष्ठतेसह रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यासाठीही याचा उपयोग होतो. एक मोठा चमचा सब्जा रात्रभर एक ग्लास पाण्यात भिजवा. सकाळी एक ग्लास टोन्ड दुधामध्ये हे फुगलेले सब्जा मिक्स करा आणि हे दूध प्या. रोज हे पिण्यामुळे तुमची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारून साखर नियंत्रणात ठेवते. तसंच यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

संदर्भ

https://lukecoutinho.com/blog/nutrition-en/sabja-health-benefits/

https://pharmeasy.in/blog/health-benefits-of-sabja-seeds/

https://www.medicalnewstoday.com/articles/basil-seeds

https://www.netmeds.com/health-library/post/sabja-seeds-uses-benefits-for-health-weight-loss-skin-and-falooda-recipe

[ad_2]

Related posts