[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
भाज्यांमधील पोषक तत्व
१२ महिने तुम्ही वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काही ठराविक भाज्यांचे सेवन करायलाच हवे. यामध्ये पालेभाज्या, कोबी, फ्लॉवर आणि अन्य काही भाज्यांचा समावेश करून घ्यायला हवा. काकडी, टॉमेटो, कांदा याचे सलाडदेखील तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करते. नियमित तुम्ही या सर्व भाज्यांचा आहारात समावेश करून घेतल्यास त्यातील पोषक तत्वांमुळे तुमच्या शरीराला फायदाच मिळतो.
पालक आणि अन्य हिरव्या भाजी
पालक आणि अन्य हिरव्या भाज्या जसे केल, सलाड इत्यादी पोटाची थुलथुलीत चरबी घटविण्यासाठी फायदेशीर ठरतात. भाजी पोटातील चरबी जळवायला मदत करते आणि त्याप्रमाणे शरीराला पोषणही देते.
पालक शरीरातील चरबी जाळून मांडी आणि पोटावरील चरबी घटविण्यास अत्यंत फायदेशीर ठरते. यासाठी तुम्ही पालक स्मूदी, पालकाची भाजी नियमित आहारात खावी. तसंच पालेभाज्यांचा आहारात अधिक वापर करावा. जेणेकरून वजन लवकर कमी होण्यास मदत मिळते.
(वाचा – ३० दिवसात १ पदार्थाने वितळेल पोटावरील चरबी, कसे कराल सेवन आणि व्हाल सडपातळ)
मशरूममुळे कमी होते वजन
शाकाहारी व्यक्तींसाठी मशरूम अत्यंत स्वादिष्ट आणि हेल्दी पर्याय ठरतो. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात येते. मशरूम रक्तातील ग्लुकोजचा स्तर नियंत्रणात आणून वजन कमी करण्यास मदत करतात आणि फॅट्स जाळण्यासही फायदेशीर ठरतात. मशरूममध्ये अधिक प्रोटीन असून मेटाबॉलिजमला अधिक बुस्ट करतात. त्यामुळे त्वरीत चरबी जाळण्यासाठी आहारात मशरूमचा समावेश करून घ्यावा.
(वाचा – अबू धाबीमध्ये सापडला कोरोनाचा नवा वेरिएंट MERs-CoV, काय आहेत लक्षणं जाणून घ्या)
फ्लॉवर आणि ब्रोकोली
ब्रोकोली आणि फ्लॉवरमध्ये फायबरचा चांगला स्रोत आहे. याशिवाय यामध्ये अनेक मिनरल्स आणि विटामिन्सदेखील असतात. तसंच ब्रोकोलीमध्ये फायटोकेमिकल्स असतात, जे शरीरातील फॅट्स कमी करण्यासाठी मदत करतात. फ्लॉवरच्या भाजीमुळे पोट पटकन भरते आणि पोट भरण्याशिवाय सूज आलेली असल्यासही फायदेशीर ठरते.
तसंच यामध्ये फायटोन्यूट्रिएंट्स सल्फोराफेन आणि चांगल्या प्रमाणात फोलेट आणि विटामिन सी देखील मिळते. ज्यामुळे अधिक प्रमाणात पटकन वजन कमी करण्यास मदत मिळते.
(वाचा – युरिक अॅसिडच्या रूग्णांसाठी ३ पदार्थ ठरतात विष, वेळीच व्हा दूर नाहीतर गमवाल जीव)
संदर्भ
https://www.cdc.gov/nccdphp/dnpa/nutrition/pdf/rtp_practitioner_10_07.pdf
https://ro.uow.edu.au/cgi/viewcontent.cgi?article=1715&context=sspapers
https://www.sciencedirect.com/science/article/abs/pii/S0271531708000328
[ad_2]