गोदान, तुतारी… ; कशी ठरतात Indian Railway च्या ट्रेनची नावं?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

How Indian Trains are Named: रेल्वेनं एखाद्या लांबच्या प्रवासाला निघताना तुम्हीही कायम उत्सुक असता ना? लांबचा प्रवास, खिडकी, बाहेर दिसणारा निसर्ग, बदलत जाणारे प्रांत अशा अनेक गोष्टींचं आपण निरीक्षण करत असतो. काही मंडळीही असंच निरीक्षण करतात, पण त्यांना आणखी एक प्रश्नही पडतो. तो म्हणजे भारतीय रेल्वेच्या ट्रेनना असणाऱ्या नावांबद्दलचा. देशात धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांना त्यांच्या स्थानकांसोबतच काही खास नावंही देण्यात आली आहेत. आता ही नावं नेमकी कशाच्या आधारे दिली गेलियेत तुम्हाला माहितीये?

देशातील संस्कृती, ऐतिहासिक वारसा, विविध क्षेत्रांमधील दिग्गजांचं योगदान या साऱ्याच्या आधारे ट्रेनची नावं ठरवली जातात. चला तर मग, देशातील लोकप्रिय रेल्वे गाड्यांच्या नावामागची रंजक कहाणी जवळून अनुभवूया…. 

गोदान एक्सप्रेस (Godan Express)

गोरखपूर ते एलटीटी मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) या स्थानकांदरम्यानचा प्रवास करणाऱ्या एक्स्प्रेसचं नाव आहे गोदान एक्स्प्रेस. 22 स्थानकांचा थांबा असणारी ही रेल्वे 34 तासांमध्ये 1729 किमी अंतराचा प्रवास पूर्ण करते. मुंशी प्रेमचंद यांच्या प्रसिद्ध हिंदी कादंबरी ‘गोदान’वरून या रेल्वेचं नाव ठेवण्यात आलं आहे. 

अरण्यक एक्सप्रेस (Aranyak Express)

पश्चिम बंगालच्या भोजुडीह जंक्शनपासून शालीमारपर्यंत चालणारी ही एक मेल एक्स्प्रेस ट्रेन. साडेचार तासांमध्ये 281 किमी इतक्या अंतराचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते. या रेल्वेचं नाव विभूतिभूषण बंधोपाध्याय यांच्या ‘अरण्यक’ या लोकप्रिय बंगाली कादंबरीवरून ठेवण्यात आलं आहे. 

 

तुतारी एक्सप्रेस (Tutari Express)

मुंबईतील दादर सेंट्रल ते सावंतवाडी रोड हे अंतर ओलांडणारी ही महाराष्ट्रातील रेल्वे. 17 स्थानकांवर थांबा घेत 10 तासांमध्ये 469 किमी इतकं अंतर ओलांडणाऱ्या या रेल्वेला कसं नाव मिळालं माहितीये? मराठी क्रांतिकारक कवी कृष्णाजी केशव दामले यांच्या ‘तुतारी’ नावाच्या कवितेवरून ट्रेनचं नाव घेण्यात आलं आहे. 

हाटे बाजार एक्सप्रेस (Hate Bazare Express)

पश्चिम बंगालमधील या रेल्वेचं नाव बंगाली भाषेतील कादंबरी हाटे बाजार (Hate Bazare) वरून घेण्यात आलं आहे. एका डॉक्टरांची कथा या कादंबरीतून उलगडत जाते. शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर बिहारमधील एका लहानशा खेड्यात गरीबांच्या सेवेसाठी आयुष्य व्यतीत करणाऱ्या डॉक्टरांची कथा इथं मांडण्यात आली आहे. 

Related posts