Ajwain for Weight Loss and Other Health Benefits How to Consume Carom Seeds; ओव्याचे शरीराला मिळतात जबरदस्त फायदे, वजन कमी करण्यासाठी कसा खावा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ओव्याचे आरोग्यदायी फायदे

ओव्याचे आरोग्यदायी फायदे

ओव्यामध्ये थायमॉल नावाचे एसेन्शियल ऑईल असून यामध्ये अँटीसेप्टिक आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुण आढळतात. केमिकल बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शन रोखण्यापासून याचा उपयोग होतो. तसंच यातील थायमॉल हे उच्च रक्तदाबावर उपाय करण्यासाठी आणि कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

तसंच शरीरावर आलेली सूज कमी करण्यसाठीही ओव्याचा उपयोग करून घेता येतो. शरीरातील ट्रायग्लिसराईडचा स्तर कमी करण्यासाठी ओव्याचा फायदा होतो यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित होऊन वजनही कमी करण्यास मदत मिळते.

वजन कमी करण्यासाठी ओव्याचे पाणी

वजन कमी करण्यासाठी ओव्याचे पाणी

Ajwain Water For Weight Loss: पोटावरील जमलेली चरबी आणि शरीरावरील अतिरिक्त लठ्ठपणा कमी करण्यासाठी योग्य पर्याय म्हणजे ओव्याचे पाणी. या पाण्याचा कोणताही स्वाद नसतो मात्र वजन कमी करण्यासाठी हे उत्तम ठरते.

  • २ चमचे ओवा तव्यावर भाजा
  • एका बाऊलमध्ये १ ग्लास पाणी उकळवा मध्यम आचेवर असताना त्यात भाजलेला ओवा मिक्स करा आणि उकळू द्या
  • काही वेळ उकळल्यावर खाली उतरवा आणि मग गाळून घ्या. थंड झाल्यावर पूर्ण दिवस हे पाणी ओव्याचे पाणी प्या. यामुळे वजन कमी होते

(वाचा – टाइप – २ डायबिटीसवर नियंत्रण मिळविण्यासाठी श्री श्री रविशंकर यांनी सांगितले ९० मिनिट्समध्ये काय खावे)

ओवा आणि मध

ओवा आणि मध

आयुर्वेदात ओवा आणि मधाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. झरझर वजन कमी करण्यासाठी तुम्ही ओव्याच्या पाण्यात मध मिक्स करून पिऊ शकता. मधातील एक्झोथिर्मिक गुणधर्मामुळे पोटावरील चरबी त्वरीत कमी करण्यास मदत मिळते. यासाठी ओवा रात्रभर पाण्यात भिजवा आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी गाळून त्यात मध मिक्स करून प्या. उपाशीपोटी हे पाणी प्यावे.

(वाचा – पिवळ्या दातांसाठी वापरा बेकिंग सोडा, हिऱ्यापेक्षाही चमकतील दात जाणून घ्या घरगुती उपाय)

भाजलेला ओवा

भाजलेला ओवा

पोटदुखीसाठी सहसा भाजलेला ओवा खाल्ला जातो. मात्र वजन कमी करण्यासाठीही ओव्याचा भाजून तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. ओवा भाजून त्याची पावडर तुम्ही करून ठेवा आणि रोज सकाळी नाश्ता करण्याआधी तुम्ही अर्धा चमचा ओव्याची पावडर खाल्ल तर १५ दिवसाच्या कालावधीमध्ये तुमचे वजन कमी होऊन शरीरावरील चरबी जाळण्यास मदत मिळते.

(वाचा – सकाळी उपाशीपोटी प्या हा चहा आणि पावसाळ्यात ठेवा सर्व आजारांना दूर, डायबिटीस रूग्णांसाठी वरदान)

डाएटमध्ये ओव्याचा वापर

डाएटमध्ये ओव्याचा वापर

ओव्याचा वापर तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांमधून करून घेऊ शकता. पराठ्यामध्ये ओवा घालून त्याचा स्वाद अधिक वाढतो आणि वजन कमी होण्यासही मदत मिळते. चिकन, फिश, लेंटिल कढीमध्ये ओवा घालता येतो. याशिवाय मांस, भात, सुप्स आणि भाज्यांमध्येही ओव्याचा वापर करून घेता येतो. ओवा हा भारतीय स्वयंपाकघरातील अत्यंत कॉमन पदार्थ आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्ही त्याचा अशा पद्धतीने वापर करून घेऊ शकता.

[ad_2]

Related posts