[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
अंडे
अंड्यामध्ये उच्च दर्जाचे प्रोटीन, फॅट्स आणि विटामिन डी, कॉलिनसारखे अत्यंत आवश्यक पोषक तत्व आढळतात. यामध्ये असणारे प्रोटीन हे वजन कमी करण्यासाठी एखाद्या पॉवरहाऊसप्रमाणे काम करते.
हाय प्रोटीन स्नॅक्समुळे वजन घटविण्यासाठी अधिक बढावा मिळतो, कारण प्रोटीन भूक नियंत्रणात राखण्याचे काम करते. म्हणून सकाळी नाश्त्यात अंडे खाल्ल्याने दुपारपर्यंत भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहाते.
(वाचा – ऋजुता दिवेकरने सांगितला वजन घटवून निरोगी राहण्यासाठी उत्तम उपाय, भारतीय सुपरफूड्सचा खजिना ठरेल वरदान)
चेरी
सर्व फळांमध्ये हाय फायबर असते. त्यामुळे फळं खाल्ल्यानंतर अधिक वेळ पोट भरल्यासारखे राहाते आणि भूकही नियंत्रणात येते. चेरीमध्ये कॅलरी कमी असून प्रोटीन अधिक मिळते. बर्गर, सूप्स आणि सलाडमध्ये याचा उपयोग करून घेता येतो. नुसतेही तुम्ही हे फळ खाऊ शकता. मात्र प्रमाणात खावे.
(वाचा – हनीमून सिस्टायसिस म्हणजे काय? या त्रासापासून कसे वाचता येईल)
अवाकाडो
अवाकाडो मोनोअनसॅच्युरेडेट फॅटी अॅसिड, डाएटरी फायबर, पोटॅशिमय आणि फायटोकेमिकल्सयुक्त असते. अभ्यासातून सिद्ध झाले आहे की, अवाकाडो खाल्ल्यामुळे पोटावरील चरबी कमी करण्यास अधिक फायदा मिळतो.
कारण अवाकाडोमध्ये अन्य फळांच्या आणि भाज्यांच्या तुलनेत अधिक कॅलरी असते, मात्र त्यातील आढळणारे लो फॅट्स आणि फायबर हे समीकरण वजन कमी करण्यासाठी उत्तम ठरते
दही
दह्यामध्ये अधिक प्रमाणात प्रोटीन आणि प्रोबायोटिक्स असतात, जे गट हेल्थसाठी अत्यंत उपयोगी ठरतात आणि तुमचे वजन कमी करून पोट आणि कंबरेवरील चरबी कमी होण्यासाठी याचा उपयोग होतो. फायबर आणि प्रोबायोटिक्सच्या खाण्यामुळे आपल्या पोटातील बॅक्टेरिया चांगला राहतो, जे मेटाबॉलिजम अधिक चांगले राहाते.
(वाचा – दुसऱ्याच दिवशी पिवळ्या दातावरील थर होईल नाहीसा, दात होतील क्लीन व्हाईट अशी बनवा टूथ पावडर)
साल्मन
साल्मन हे नॉनव्हेजटेरियन व्यक्तींसाठी प्रोटीनचे अत्यंत चांगले स्रोत आहे. साल्मन फिशमधून जास्त प्रमाणात प्रोटीन मिळते आणि याशिवाय ओमेगा – ३ फॅटी अॅसिडही यातून प्राप्त होते. अहवालानुसार, साल्मन आपली कॅलरी इनटेक कमी करते आणि वजन कमी करण्यासाठी याचा अधिक चांगला फायदा करून घेता येतो.
पॉपकॉर्न
हा एक उत्तम पर्याय आहे जो वजन कमी करण्यसाठी तुम्ही करू शकता. पॉपकॉर्नमध्ये केवळ फायबरचे प्रमाण अधिक असते आणि त्याशिवाय यातून अधिक प्रमाणात प्रोटीनही मिळतात. हे कॉम्बिनेशन वजन कमी करण्यासाठी मदत करते आणि तुमचे पोट सपाट होण्यास मदत मिळेल.
बदाम
विटामिन ई युक्त असणारा बदाम हा हृदयासाठी अत्यंत उत्तम मानला जातो. बदामामध्ये पॉलअनसॅच्युरेटेडचा एक चांगला स्रोत आहे. बदाम सलाड अथवा सुपमध्ये याचा वापर केला जातो अथवा नुसते बदामही तुम्ही खाऊ शकता. बदाम हा अत्यंत चांगला पर्याय आहे.
संदर्भ
https://www.medicalnewstoday.com/articles/320613
https://www.eatingwell.com/article/16054/8-best-foods-to-eat-for-weight-loss/
[ad_2]