Advance Blood Test Now 18 types of infection and inflammation will be detected by a blood test;एका रक्त चाचणीने होणार 18 प्रकारच्या इन्फेक्शनची तपासणी, तासाभरात मिळणार रिपोर्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Advance Blood Test: सध्या विविध कारणांमुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. सतत ताप येत असेल तर रक्त चाचणी करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. यातून आपल्याला संबंधित आजाराची तीव्रता कळते. दरम्यान ब्रिटीश संशोधकांनी रक्त चाचणी संदर्भात एक आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी एक अशी रक्त चाचणी तयार केली आहे ज्यात18 प्रकारचे संसर्गजन्य किंवा दाहक रोग शोधले जाऊ शकतात. ज्यामध्ये ग्रुप बी स्ट्रेप्टोकोकस (जीबीएस), सिंसिटिअल व्हायरस (आरएसव्ही), क्षयरोग आणि श्वसन रोगांचा समावेश आहे.

केवळ एका रक्त तपासणीद्वारे आता प्रकारचे जीन्स आणि संसर्गास कारणीभूत बॅक्टेरिया शोधले जाऊ शकतील. पर्यायाने डॉक्टरांकडून रुग्णावर तशाप्रकारे उपचार केले जाऊ शकतील. 

एवढेच नव्हे तर या चाचणीचा अहवाल यायला 10-15 दिवसाचा कालावधी लागणार नाही तर अवघ्या 1 तासाच्या आत याचा रिपोर्ट मिळू शकणार आहे. तर आत्तापर्यंत काही संसर्गजन्य रोग शोधण्यासाठी कित्येक तास ते दिवस किंवा आठवडे लागायचे. त्या तुलनेत एका टेस्टमध्ये 18 प्रकारचे संसर्गजन्य शोधणे हे मोठे पाऊल मानले जात आहे. 

इम्पीरियल कॉलेज लंडनचे संशोधक रुग्णांच्या जनुकांच्या अभिव्यक्तीच्या आधारावर ही चाचणी करतात. ज्यामुळे बालपणातील अनेक आजार वेळेपूर्वी शोधून त्यावर वेळेत उपचार करता येतात.

“वैद्यकीय तंत्रज्ञानामध्ये मोठी प्रगती असूनही, जेव्हा एखाद्या मुलाला तापाने रुग्णालयात आणले जाते, तेव्हा डॉक्टरांचा प्रारंभिक दृष्टीकोन हा मुलाच्या आजाराची संभाव्य कारणे शोधून त्यावर उपचार करणे हा असतो. अशावेळी आपल्याला त्वरित उपचार करणे आवश्यक असते.  या चाचण्यांमुळे आपले काम सोपे होईल, असे प्रोफेसर मायकेल लेव्हिन यांनी सांगितले.

आई-वडिलांना त्रास देणाऱ्या मुलांची वारसा नोंद होणार रद्द, ‘या’ ग्रामपंचायतीने घेतला निर्णय

अनेक वेळा आजारी मुलावर त्याच्या पालकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आणि आमच्या वैद्यकीय अनुभवाच्या आधारे ताबडतोब उपचार करावे लागतात. परंतु ताप हा जीवाणूजन्य आहे की विषाणूजन्य आहे हे आम्हाला रुग्ण बघून सांगता येत नाही. त्यामुळे रक्त तपासणीचा अहवाल आल्यानंतरच योग्य उपचार सुरू होतात. आजारी मुलाला योग्य उपचार मिळण्यासाठी अनेक तास किंवा दिवस लागायचे. मात्र आता या नव्या जलद रक्त तपासणीमुळे रुग्णांना प्राथमिक अवस्थेतच योग्य उपचार मिळण्यास सुरुवात होईल.

(Desclaimer: आमचा लेख फक्त माहिती देण्यासाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी, घोडबंदरमधील ट्रॅफीक कमी करण्यासाठी MMRDAचा मोठा निर्णय

Related posts