Neem Leaves Reduce Piles Hemorrhoids Mulwyadh Symptoms Know How to Take It; मुळव्याधात रक्तस्त्रावाने बेजार झालात, अगदी फुकट हा पाला तुमच्या जखमा दूर करेल..ऑपरेशनचीही गरज नाही

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

​कडुलिंब कसा फायदेशीर?​

​कडुलिंब कसा फायदेशीर?​

कडुनिंबाच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे मूळव्याधशी संबंधित सूज आणि वेदना कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात. याशिवाय कडुलिंबातील गुणधर्म मूळव्याधांमुळे वाढणाऱ्या बॅक्टेरियाच्या समस्या कमी करू शकतात. कडुनिंबाच्या पानांचा मूळव्याधमध्ये काही दिवस वापर करून, खाज, सूज, जळजळ, वेदना आणि संसर्ग वाढण्यापासून रोखू शकता. यासोबतच आतड्याच्या हालचालींची समस्याही दूर करू शकते.

​कडुलिंबाच्या पानांचा रस

​कडुलिंबाच्या पानांचा रस

मूळव्याध किंवा त्याची लक्षणे कमी करण्यासाठी कडुलिंबाची पाने कुस्करून त्याचा रस काढा, नंतर हा रस कोमट पाण्यात मिसळा. आता या पाण्यात थोडा वेळ बसा, मूळव्याधची सूज कमी होऊ शकते. यासोबतच आतड्यांसंबंधीच्या समस्यांपासूनही आराम मिळू शकतो.

​(वाचा – रोज आंघोळ करताय? चांगल्या आरोग्यासाठी कोणत्या वेळी आंघोळ करणे योग्य, नियम जाणून घ्या)​

​कडुलिंबाचे तेल

​कडुलिंबाचे तेल

कडुलिंबाच्या तेलाचा वापर मुळव्याधच्या लक्षणांपासून आराम मिळवण्यासाठी केला जाऊ शकतो. यासाठी एक सुती कापड घ्या, या कपड्याला तेल लावा आणि प्रभावित भागावर लावा. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळू शकतो.

मुळव्याधच्या समस्येवर कडुलिंबाची पाने फायदेशीर ठरू शकतात. लक्षात ठेवा की या परिस्थितीत, एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच, तुम्हाला कडुलिंबापासून कोणत्याही प्रकारच्या ऍलर्जीची तक्रार असल्यास, अशा परिस्थितीत कडुलिंबाचा वापर टाळा.

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

[ad_2]

Related posts