[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
युरिक अॅसिडसाठी उपाय
युरिक अॅसिडसाठी बाजारामध्ये अनेक औषधंही उपलब्ध आहेत. मात्र तुम्हाला घरगुती उपाय करायचा असेल तर त्यासाठी नैसर्गिक पद्धतीचा अवलंब तुम्ही करू शकता. हेल्थ एक्सपर्टच्या सांगण्यानुसार, खाण्यापिण्यात काही विशिष्ट बदल करून तुम्ही युरिक अॅसिडवर नियंत्रण मिळवू शकता.
यासाठी काळ्या मनुका उपयोगी ठरतात. काळ्या मनुकांमध्ये असणारे कार्ब्स, प्रोटीन, फायबर, साखर, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, लोह आणि विटामिन सी हे अत्यंत उपयोगी ठरते. हाडांच्या मजबूतीसाठी याचा अधिक फायदा मिळतो.
कसा मिळतो काळ्या मनुकांचा फायदा
काळ्या मनुकांमध्ये अनेक पोषक तत्व असून हाडांच्या बळकटीसाठी तुम्ही नियमति रात्री भिजवलेल्या मनुका खाव्यात असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. यातील प्रोटीन, फायबर, पोटॅशियम हे हाडांचे घनत्व वाढविण्यास उपयोगी ठरते.
(वाचा – त्वरीत वजन वाढविण्यासाठी या पदार्थांचा करा समावेश, १२ स्टेप्स आणि अंगावर चढेल मांस)
Osteoporosis साठी उपयोगी
याशिवाय ज्यांना Osteoporosis आजाराचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हे वरदान ठरते. यामध्ये High Calcium असून युरिक अॅसिडचे खडे शरीरामध्ये जमा न होऊ देण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच एका शोधानुसार, काळ्या मनुकांमधील मॅग्नेशियम हाडं कमकुवत होण्यापासून वाचवतात.
(वाचा – सफेद दातांवर जमतोय पिवळा थर बनवा अशा घरगुती पेस्ट, दात चमकतील हिऱ्यांसारखे)
किडनीसाठी उपयुक्त
युरिक अॅसिड हे किडनी फिल्टर करते. मात्र याचा सर्वाधिक त्रास किडनीला होतो. त्यामुळे तुम्ही काळ्या मनुकांचे सेवन केल्यास, त्याचा किडनीला अधिक फायदा मिळू शकतो.
याच्या सेवनामुळे किडनी अधिक चांगल्या पद्धतीने काम करते. किडनीमधून युरिक अॅसिड त्वरीत बाहेर पडण्यासाठी मनुकांचा उपयोग होतो. रोज रात्री पाण्यात मनुका भिजवून सकाळी उपाशीपोटी खाल्ल्याने किडनीला फायदा मिळतो.
(वाचा – Magical Grain: किडनी, लिव्हर आणि हृदय निरोगी ठेवणारे सर्वात हेल्दी पीठ, डाएटमध्ये असा करा वापर)
कसे करावे सेवन
रात्री १०-१५ काळ्या मनुका तुम्ही १ ग्लास पाण्यात भिजवा. सकाळी उपाशीपोटी दात घासून झाल्यानंतर या सर्व मनुकांचे सेवन करा. यामुळे सांध्यातील युरिक अॅसिड त्वरीत बाहेर फेकण्यास मदत मिळते. याशिवाय तुम्ही भिजवलेल्या मनुकांचे पाणीही पिऊ शकता. हा उपाय केल्यानंतर सांधेदुखीमध्ये सुधारणा तुम्हाला लवकरच दिसून येईल.
संदर्भ
https://www.researchgate.net/publication/338213976_Is_Eating_Raisins_Healthy
https://www.lybrate.com/topic/raisins-benefits
https://www.sciencedirect.com/science/article/pii/S0022316622003030
[ad_2]