( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुस्लीम मैत्रिणीसह फिरणाऱ्या एका हिंदू तरुणाला जमावाकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये हा प्रकार घडला आहे. 26 ऑगस्ट रोजी ही घटना घडली असून, तरुण आणि तरुणी शहरात फिरत असताना जमावाने त्यांना थांबवलं. यानंतर काहीजणांनी तरुणाला कानशिलात लगावल्या. इतकंच नाही तर तरुणीचा बुरखा वारंवार खेचत चेहरा झाकण्यापासून थांबवलं. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत जमावातील काही तरुण दोघांना जाब विचारताना दिसत आहेत. तरुणाला मारहाण केली जात असून, बुरखा घातलेल्या मुस्लीम तरुणीलाही खडसावत आहेत. यावेळी ते तरुणाला ‘मुस्लीम तरुणीसह फिरण्याची हिंमत कशी झाली?’ अशी विचारणा करताना दिसत आहेत.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अहमदाबाद पोलिसांनी कारवाई केली असून, तिघांना अटक केली आहे. अटक केलेल्यांची नावं अकबर पठाण, फैजन शेख आणि हुसेन सय्यद अशी आहेत. त्यांच्याविरोधात आयपीसीमधील वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
This is from Ahmedabad!
Burqa of a muslim lady forcefully removed by Muslim mob for roaming with a Hindu boy.
Boy and Girl abused and beaten by Muslim mob.@sanghaviharsh @GujaratPolice this incident happened near Chirag High School. Please strict take action. pic.twitter.com/uf7o66DK8S
— Facts (@BefittingFacts) August 28, 2023
याआधी सोमवार, 28 ऑगस्ट रोजी, वडोदरा पोलिसांनी मुस्तकीम शेख, बुरहान सय्यद आणि साहिल शेख या तिघांना आंतरधर्मीय जोडप्यांना लक्ष्य करणे, त्यांचा छळ करणे आणि धार्मिक गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करण्यासाठी त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्याबद्दल अटक केली होती.
नंतर, या प्रकरणावर बोलताना, अहमदाबाद पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींनी एका महिलेला लक्ष्य केलं होतं. ही महिला दुसऱ्या धर्माच्यापुरुषासोबत दिसली असता त्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्याचा वापर ब्लॅकमेल करण्यासाठी केला गेला. पोलिसांनी त्यांचे मोबाईल फोन जप्त केले असून, सर्व ऑडिओ आणि व्हिडिओ रिकव्हर करण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) कडे पाठवले आहेत.