तरुणीने असं काही केलं की शरीराची सगळीच रचनाच बदलली; फोटो तुफान व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सोशल मीडिया हे आता फक्त आपली मतं किंवा खासगी आयुष्यातील गोष्टी शेअर करण्याचं माध्यम राहिलेलं नाही. याउलट हे आता अनेकांसाठी कमाईचं माध्यम झालं आहे. सोशल मीडियामुळे काहीजण इतके प्रसिद्ध झाले आहेत की, तितकी प्रसिद्दी काही सेलिब्रिटींना मिळत नसावी. दरम्यान, सोशल मीडियावर फोटो शेअर करताना ते व्यवस्थित एडिट केले जातील याची खात्री केली जाते. एखादं फिल्टर तसंच एडिटिंगचे इतर पर्याय वापरले जातात, जेणेकरुन आपण वाईट दिसू नये. पण दक्षिण कोरियाच्या एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचे फोटो मात्र चर्चेचा विषय ठरला आहे. 

शशीले असं या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं नाव असून, ती आपले फोटो फार अजब पद्धतीने एडिट करत असते. हे एडिटिंग अशा प्रकारचं असतं की ते पाहून हसू आवरणार नाही. 

शशीले इन्स्टाग्रामवर पोस्ट करणाऱ्या आपल्या फोटोंमध्ये इतकी अजब दिसते की, हे फोटो पाहून तुम्हीही हैराण व्हाल. फोटोंमध्ये तिची कंबर एकदम नाजूक असून शेप्ड ब्रेस्ट तसंच लांब हात-पाय आणि मान असून तोंड मात्र छोटं दिसत आहे. पण हे फोटो विचित्र असले तरी तिचे फॉलोअर्स मात्र प्रचंड आहेत. 

3 लाख फॉलोअर्स

शशीलेचे इन्स्टाग्रामवर 3 लाख फॉलोअर्स आहेत. तसंच तिच्या फॉलोअर्सची संख्या वाढत चालली आहे. देशातील काही मुख्य प्रसारमाध्यमांनी तिची दखल घेतल्याने तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. कमेंट करणारे अनेकजण तिच्या एडिटिंगवरुन टीका करत असतात. तर काहीजण मात्र आपल्याला या एडिटिंगमुळे काही फरक पडत नसल्याचं सांगतात. 

AI लाही लाज वाटेल अशी एडिटिंग

शशीलेच्या फोटोंवर युजर्सकडून कमेंटचा पाऊस पडत असतो. एका युजरन हे कृत्रिम सौंदर्य असल्याची टिप्पणी केली आहे. तर एकाने म्हटलं आहे की, तू तुझ्याकडे असणारी प्रत्येक गोष्ट कशी काय मोडू आणि वाकवू शकतेस? तू मॅजिक क्वीन असून, आम्हालाही काही टिप्स दे. 

तर एका युजरने म्हटलं आहे की, तू म्हणजे एडिटिंगची हद्द आहे. तुझं हे एडिटिंग पाहून AI लाही लाज वाटेल. दरम्यान, सकारात्मक असो किंवा नकारात्मक, शशीलेला या माध्यमातून प्रसिद्धी मिळत आहे. 

Related posts