चार डोळे अन्…; मच्छिमाराच्या जाळ्यात फसला विचित्र मासा, प्रजातीची माहिती ऐकताच गावकरीही चकित

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Trending News: मच्छिमाराच्या जाळ्यात एक अनोखा मासा फसला आहे. हा विचित्र मासा पाहण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी एकच गर्दी केली आहे.  तर नक्की हा मासा कोणत्या प्रजातीचा आहे हे पाहण्यासाठी लोक मोठी गर्दी करत आहेत. ही घटना परदेशात नव्हे तर आपल्या भारतातच समोर आली आहे. बिहार राज्यातील बेतियामध्ये ही घटना उघडकीस आली आहे. 

बेतिया जिल्ह्यातील लैरिया येथील लाकड गावात ही विचित्र आणि अनोखा मासा सापडला आहे. या गावाच्या जवळूनच एक नदी वाहते. त्या नदीत मच्छिमार मासेमारी करतात. मासेमारी करत असताना एका मच्छिमाराच्या जाळ्यात हा मासा आला आहे. या माशाला चार डोळे आहेत तर विमानासारखे या माशाचे शरीर आहे. करडा रंग असून त्यावर सफेद रंगाची नक्षी आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, सकरमाउथ कॅटफिश (Suckermouth catfish) असं या माशाचे नाव असून या प्रजातीचे मासे साधारणतः अमेरिकेतील नदीत सापडतात. 

हा विचित्र आणि अनोखा मासा पाहण्यासाठी स्थानिक गावकऱ्यांनी एकच गर्दी केली आहे. जाणकारांच्या मते, सकरमाउथ कॅटफिश अमेरिकेतील अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात जास्तकरून आढळले जाते. या प्रजातीचे मासे एका दुसऱ्या माशांची अंडी खातात. त्यामुळं दुसऱ्या प्रजातींच्या माशासाठी हे मासे धोकादायक ठरतात, असं म्हटलं जातं. 

गावाचे स्थानिक वीरेंद्र चौधरी यांच्या जाळ्यात या प्रजातीचे दोन मासे सापडले आहेत. सध्या त्यांनी घरातच या माशांना सुरक्षित ठेवले आहे. तसंच, अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली आहे. 

अमेरिकेतील नदीत आढळतो मासा

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत आढळणारी ही माशांची प्रजाती काही लोकांनीच भारतात आणली होती. घरातील फिश टँकमध्ये ठेवून घराची शोभा वाढवण्यासाठी सकरमाउथ कॅटफिशचा वापर लोकं करायचे. मात्र, त्यानंतर या दुर्मिळ प्रजातीला नदीत सोडण्यात आले. त्यानंतर भारतातील गंडक, कोसी, गंगासारख्या नद्यांमध्ये हा मासा दिसू लागला. 

दुसऱ्या माशांसाठी धोकादायक 

सकरमाउथ कॅटफिश या माशाचे प्रजनन जास्त वेगाने होते. त्याचबरोबर इतर जलचरांसाठी हा मासा धोकादायक आहे. म्हणजेच इतर माशांची अंडी खाण्याबरोबरच दुसऱ्या माशांनाही ही प्रजाती भक्क्ष करते. त्यामुळं नदीत या मासा असणे धोकादायक मानले जाते. 

सकरमाउथ कॅटफिश बिहारमध्ये सापडल्यामुळं पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. माशाला चार डोळे असल्यामुळं तो दिसायला विचित्र दिसत असल्याचं ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सध्या या माशाला मच्छिमाराने त्याच्या घरातच सुरक्षित ठेवले आहे. 

Related posts