rajasthan government currupt officer jyoti bhardwaj bought 26 flats in one day

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Jyoti Bhardwaj : भ्रष्टाचाराची आजपर्यंत आपण अनेक प्रकरणं ऐकली असतील, पण एका महिला अधिकाऱ्याने भ्रष्टाचाराचे (Curruption) सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. या महिला अधिकाऱ्याने अवघ्या एका दिवसात 5 कोटी रुपयांत तब्बल 26 फ्लॅट खरेदी केले. विशेष म्हणजे याची नोंदणीही अवघ्या दोन दिवसात करण्यात आली.  या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे ज्योती भारद्वाज (Jyoti Bhardwaj). 26 फ्लॅटपैकी 15 फ्लॅट ज्योती भारद्वाजने स्वत:च्या नावावर तर 11 फ्लॅट मुलगा रोशन वशिष्ठच्या नावावर खरेदी केले. या घरांची नोंदणी अधिकाऱ्यांना आदेश देत अवघ्या 48 तासात करण्यात आली 

ज्योती भारद्वाज राजस्थानच्या (Rajasthan) जयपूर सचिवालयात शासन सचिव पदावर कार्यरत आहे. ज्योती भारद्वाज यांच्या भ्रष्टाचाराचे कारनामे बाहेर आल्यानंतर संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरला आहे. 

ज्या फ्लॅटच्या खरेदीसाठी ज्योती भारद्वाजने बिल्डरला धनादेश दिलेत, ते धनादेश आज दिड वर्षानंतरही बँकेत वटवण्यात आलेले नाहीत. सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी आपल्या संपत्ती माहिती देणं भाग असतं. पण ज्योती भारद्वाजने 26 फ्लॅट्सची माहिती दिली नव्हती. या सर्व फ्लॅटची माहिती तीने लपवली होती. सरकारी माहितीत तिने केवळ आपल्याकडे तीन घरं असल्याचं म्हटलं आहे. यात पतीने कर्ज काढून एक घर घेतल्याचं म्हटलंय. तर दुसऱ्या घरासाठी आपण स्वत: लोन काढण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. . पण सब जयपूरच्या रजिस्टर कार्यालय 4, 5 मार्च 2022 रोजी ज्योती भारद्वाजच्या नावावर 26 फ्लॅट्सची नोंदणी झाली आहे. ज्याची किंमत 4 कोटी 71 लाख रुपये आहे. या घरांसाठी 30 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी तीने भरली आहे. 

कोण आहे ज्योती भारद्वाज
ज्योती भारद्वाज  जयपूर सचिवालयात शासन सचिव पदावर कार्यरत आहे. त्याआधी अलवरमध्ये जिल्हा कोषाधिकारी आणि मत्स्य विद्यापीठात आर्थिक नियंत्रक पदावर कार्यरत होत्या. 

बिल्डरला दिले धनादेश
ज्योती भारद्वाजने हे 26 फ्लॅट मानसरोवर लिंक रोडवरली बोनी बिल्डटेकचे डायरेक्टर अजय सिंह यांच्याकडून खरेदी केले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व फ्लॅट विकत घेण्यासाठी ज्योती भारद्वाजने कोणत्याही बँकेचे लोण घेतलेलं नाही. त्यामुळे प्लॅट खरेदी करण्यासाठी ज्योती भारद्वाजकडे  पाच कोटी कुठून आले असा प्रश्न विचारला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्योती भारद्वाजने बिल्डरला धनादेश दिले होते. पण जे खरेदीच्या दिड वर्षांनंतरही बिल्डरकडून बँकेत वटवण्यात आलेले नाहीत. याबाबत बोनी बिल्डरचे संचालक अजय सिंह यांनी ज्योती भारद्वाज यांच्यावर फसवणूकीचा आरोप केला आहे. अजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व चेक बाऊंस झाले आहेत. 

प्रकरण कोर्टात
ज्योती भारद्वाजने बिल्डर अजय सिंहला काही चेक स्वत:च्या नावाचे तर काही चेक पती अरविंद यांच्या नावाचे दिले आहेत. चेक कॅश का केले नाहीत या प्रश्नाला उत्तर देताना ज्योती भारद्वाजचा पती अरविंद यांनी हे प्रकरण कोर्टात असल्याचं म्हटलं आहे. ज्योती भारद्वाज यांच्याकडे इतकी संपत्ती आली कुठून याची जोरदार चर्चा सुरु आहे. दुसरीकडे हे प्रकरण समोर आल्यानंतर वित्त व लेखा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीची बैठक घेतली. ज्योती भारद्वाज यांनी सरकारी अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी दरवर्षी दिलेल्या मालमत्तेच्या तपशीलात 26 फ्लॅट खरेदी केल्याची माहिती का दिली नाही, याचा तपास लेखा आणि कार्मिक विभाग करत आहे. 

हे प्रकरण समोर आल्यानंतर विभागाने ज्योती भारद्वाजला नोटीस देण्याची तयारी केली आहे. मात्र ज्योती भारद्वाज यांच्या विरोधात विभागाकडून अद्याप एफआयआर का दाखल करण्यात आलेली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Related posts