दिवाळीपूर्वीच एलआयसी एजंटना सरकारचे मोठे गिफ्ट; अर्थ मंत्रालयाकडून 4 महत्त्वाच्या घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Lic Agents Benefit: एलआयसी एजंटना बाप्पा पावला आहे कारण देशातील 13 लाख भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या एजंटसना (LIC Agents) केंद्र सरकारने मोठी भेट दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने एलआयसी कर्मचारी आणि एलआयसी एजेंटसाठी ग्रॅच्युटी, फॅमिल पेन्शनसह अनेक मोठ्या घोषणा जाहीर केल्या आहेत. सरकारच्या या निर्णयाचा 13 लाखांहू अधिक एलआयसी एजंटना फायदा होणार आहे. 

केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांबरोबरच एजेंटसाठीही ग्रॅच्युटीची मर्यादा वाढवण्यापर्यंत ते एजंट रिन्यूएबल कमिशन, कौटुंबिक विमा, कर्मचारी तसेच विमा कवच वाढवण्याची घोषणा केली आहे. दिवाळीआधीच केंद्रीय अर्थमंत्रालयाने एलआयसीच्या कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. सरकारने एलआयसी (एजंट) विनियम 2017 मध्ये सुधारणा करून एलआयसी एजंटना कर्मचार्‍यांना ग्रॅच्युइटी, कौटुंबिक निवृत्ती वेतन विमा यासारख्या सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. 

सरकारने एलआयसी एजंटसाठी ग्रॅच्युइटीची मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. एलआयसी एजंटची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. ग्रॅच्युइटीसोबतच त्यांना विमा संरक्षणाचाही लाभ मिळणार आहे. सरकारने विमा संरक्षणाची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने मुदत विमा संरक्षणाची सध्याची मर्यादा 3,000-10,000 रुपयांवरून 25,000-1,50,000 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारने एलआयसी कर्मचाऱ्यांना ३० टक्के समान दराने कौटुंबिक पेन्शनचा लाभ देण्याची घोषणा केली आहे. एलआयसीचे एजंट आणि कर्मचारी एलआयसीच्या वाढीसाठी आणि भारता एलआयसीचे काम पोहोचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात, असं एलआयसीने सांगितलं आहे. 

दरम्यान, LIC ची सुरुवात 1956 मध्ये 5 कोटी रुपयांच्या भांडवलाने झाली होती. आज ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. LIC ची  उलाढाल 40.81 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे.

Related posts