Indore Zomato Girl : सुपर बाइक, वेस्टर्न लुक..! ‘या’ डिलिव्हरी गर्लला पाहून लोकांच्या नजरा खिळल्या, Video Viral

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Indore Zomato Girl Video : तुम्ही ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटोचा खूप वापर करत असाल. पण तुमच्या दारावर कधी बोल्ड आणि वेस्टर्न लुकची ही तरुणी डिलिव्हरी करण्यासाठी आली आहे. अहो सध्या झोमॅटो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. सुपर बाइक, वेस्टर्न लुकमधील ही डिलिव्हर गर्लचा इंदूरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तिला बघून रस्त्यावरील प्रत्येक जण आश्चर्यचकित होतोय. (zomato delivery girl hot girl on super bike in indore people eyes are stopping after seeing video gone viral after ceo deepinder goyal reacts trending news)

बाइक चालवणारी खूपच स्टायलिश तरुणी रस्त्यावरून जात असताना अनेकांच्या नजरा त्यावर खिळतात. नेटकऱ्यांना वाटतं आहे की झोमॅटो कंपनीच्या प्रचार मोहिमेचा हा एक भाग आहे. त्यांनी मॉडेल्सचा बाइकवरुन प्रचार करण्यासाठी निवडलं असेल असा समज आहे. 

हा व्हिडीओ इंदूरमधील विजय नगर भागातील असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला आहे. राजीव मेहता नावाच्या युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म  X वर हा व्हिडीओ शेअर पोस्ट केला आहे. या व्हिडीओसोबत त्यांनी लिहिलं आहे की, इंदूर झोमॅटोच्या मार्केटिंग प्रमुखाची ही कल्पना होती. त्यांनी झोमॅटोच्या रिकाम्या पिशव्या घेऊन सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास गाडी चालवण्यासाठी मॉडेलला हायर केलं होतं. हे मॉडेल कोण आहे याबद्दल कोणतीही माहिती नाही. 

इंदोरमधील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. विशेष म्हणजे या बाइकवर नंबर नाही आणि त्या तरुणीने हेल्मेट घातलेला नाही.  झोमॅटोचं लाल टीशर्ट आणि बँग घेतलेली अतिशय बोल्ड अंदाजमध्ये एक तरुणी स्टायलिश आणि वेस्टर्न लूकमध्ये सुपर बाइक चालवताना पाहून अनेकांच्या विश्वासच बसत नाही आहे. तुम्ही पाहू शकता जेव्हा तिची बाइक ट्रॅफिक पाईंटवर थांबते, तेव्हा तिला इतर वाहनावरील लोक काहीतरी विचारत आहेत. 

दरम्यान इंदूर झोमॅटो गर्लच्या व्हिडीओबद्दल झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दीपंदर गोयल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर जाऊन या व्हिडीओचं सत्य सांगितलं आहे. 

ते म्हणाले आहेत की,  झोमॅटोचा त्या मुलीशी काहीही संबंध नाही आणि त्यांच्याकडे इंदूरमध्ये कोणतेही विपणन प्रमुख नाही आणि झोमॅटो विनाहेल्मेट-लेस रायडिंगला प्रोत्साहन देत नाहीत. झोमॅटोसाठी शेकडो महिला फुड डिलिव्हरी करत आहेत, असंही त्यांनी सांगितले. झोमॅटोसाठी फुड डिलिव्हरी करून त्या त्यांची आणि त्यांच्या कुटुंबासाठी उदरनिर्वाह करतात. त्यांना त्यांच्या कामाच्या नैतिकतेचा अभिमान असल्याचंही त्यांनी या पोस्टमध्ये सांगितलं आहे. 

Related posts