Success Story Aradhya Tripathi Google Offer 56 Lakhs Package;32 लाख पगाराला नाही म्हणाली, गुगलकडून 56 लाखांचे पॅकेज ऑफर; आराध्या त्रिपाठी आहे तरी कोण

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Success Story: छोट्याशा गावातून येऊन घरातून फारसे पाठबळ नसताना यशाच्या शिखरावर पोहोचणाऱ्या व्यक्ती पुढच्या पिढीसाठी प्रेरणा बनतात. यूपीमधील एका छोट्या गावातून आलेल्या मुलीने असाच पराक्रम केला आहे. त्यामुळे आज तिच्या कुटुंबाला, तिच्या गावाला आणि संपूर्ण देशाला तिचा अभिमान आहे. उत्तर प्रदेशातील मगर भागातील गोठवा गावातील रहिवासी असलेली आराध्या त्रिपाठी तरुणांसाठी उत्तम उदाहरण बनली आहे. तिने 32 लाख रुपयांचे पॅकेज असलेली नोकरी नाकारली. त्यानंतर तिला गुगलने गलेलठ्ठ पगाराची ऑफर केली. कोण आहे आराध्या त्रिपाठी? कोणत्या क्षेत्रात तिने करिअर केले? तिला कसे यश मिळाले? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

आराध्याला स्केलर कंपनीकडून 32 लाख रुपयांची नोकरी ऑफर करण्यात आली. पण आराध्याने ती ऑफर नाकारली. त्यानंतर तिने 56 लाख रुपयांचे पॅकेज असलेली ऑफर स्वीकारली. गुगलकडून कडून MMMUTच्‍या माजी विद्यार्थ्याला मिळालेले 56 लाख रुपयांचे हे सर्वात मोठे पॅकेज आहे.आराध्याचे वडील वकील आहेत तर आई गृहीणी आहे. तिला लहानपणापासून शिक्षणाची आवड होती. सेंट जोसेफ शाळेत तिने आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. यानंतर तिने MMMUT मधून कॉम्प्युटर इंजिनीअरींगमध्ये बीटेक केले. 

आराध्याला तंत्रज्ञानाविषयी खूप माहिती जाणून घ्यायची. अगदी लहान वयातच तिने तांत्रिक क्षेत्रात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून स्केलरमधील तिचा प्रवास खूप यशस्वी ठरला.

आराध्याला स्केलर येथे तिच्या कामगिरीसाठी 32 लाख रुपयांचे पॅकेज ऑफर केले जात होते. पण तिच्यासाठी आणखी मोठ्या संधींचा मार्ग मोकळा झाला. दरम्यानच्या काळात आराध्याला टेक जायंट गुगलकडून एक तगडी ऑफर आली. आराध्याने कॉलेजवरच नव्हे तर संपूर्ण तांत्रिक क्षेत्रावर आपली छाप सोडली आहे. आणि गुगलमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनीअर म्हणून सर्वाधिक मागणी असलेले स्थान प्राप्त केले आहे.

लाइव्ह प्रोडक्शन ट्रॅफिक हाताळण्यासाठी आणि अशा कठीण स्पर्धात्मक वातावरणात उत्पादन वाढवण्यासाठी तिच्या व्यावहारिक ज्ञानाचा कंपनीला खूप फायदा होतो. माझी React.JS, React Redux, NextJs, Typescript, NodeJs, MongoDb, ExpressJS आणि SCSS सारख्या अनेक तंत्रज्ञान स्टॅकवर मजबूत पकड आहे.

मला यात खूप रस आहे. डेटा स्ट्रक्चर्स आणि अल्गोरिदममध्ये आणि विविध कोडिंग प्लॅटफॉर्मवर सुमारे 1000+ प्रश्न सोडवले आहेत आणि त्यांना चांगले रेटिंग मिळाले असल्याची माहिती आराध्याने लिंक्डइनवर दिली आहे.

Related posts