‘आराम कशाला? 12 तास काम करा’; नारायण मूर्तींमागोमाग आणखी एका उद्योजकाचं वक्तव्य

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Job News : माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात (IT) नावाजलेल्या इन्फोसिस या कंपनीच्या सह संस्थापकपदी असणाऱ्या नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांनी नुकतंच एका परिषदेत एक वक्तव्य केलं. त्यांच्या या एका वक्तव्यामुळं देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. जिथं त्यांनी सध्याच्या तरुण पिढीनं आठवड्याभरात किमान 70 तास काम (Working Hours) करणं अपेक्षित असून, देशबांधणीसाठी हेच महत्त्वाचं असल्याचं म्हटलं. मूर्ती यांच्या या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. 

नारायण मूर्ती यांच्या या वक्तव्यावर तरुणाईनं नाराजी व्यक्त केलेली असतानाच आम्ही न सांगताही 70 तासांहून अधिक वेळ काम करतो असं म्हणत सध्याच्या दिवसातील वस्तुस्थिती त्यांच्यापुढं ठेवली. त्यातच आता आणखी एका बड्या उद्योजकानं मूर्ती यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं. 

 JSW Group च्या अध्यक्षपदी असणाऱ्या  Sajjan Jindal यांनीही मूर्तींच्या वक्तव्याचं समर्थन केलं. इथं कामाप्रती असणाऱ्या समर्थनाची चर्चा सुरु आहे, असं म्हणत आपल्याला भारत देशाता एक महासत्ता बनवायचं आहे, 2047 पर्यंत आपल्याला यासाठी प्रचंड अभिमान वाटेल हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. 

कार्यपद्धतीत बदल करण्याची गरज… 

सध्या एखाद्या विकसमशील देशाला ज्या कार्यपद्धतीची गरज आहे ती, पद्धत, संस्कृती अद्याप भारतात रुजलेली नाही असं म्हणत जिंदाल यांनी भारतात आठवड्यातील 5 दिवस काम करण्याच्या नियमाकडे लक्ष वेधलं. ‘आपले पंतप्रधान दिवसातील 14 ते 16 तास काम करतात, माझे वडील आठवड्यातून 12 ते 14 तास काम करायचे, मी स्वत: आठवड्यातून 10 ते 12 तास काम करतो. आपल्याया देश पुढे न्यायचा असेल कर कामाप्रती समर्पकता शोधावीच लागेल. आपण ज्या आव्हानांचा सामना करत आहोत ती इतर विकसित देशांहून पूर्णपणे वेगळी आहेत. तिथं आठवड्यातून 4 ते 5 दिवस काम केलं जातं. कारण, त्यांच्या आधीच्या पिढीनं जास्तीत जास्त तास काम करून मेहनत केली आहे. आपल्याकडे आठवड्यातील कमी दिवसांचं काम हे प्रमाण असूच शकत नाही’, असं ते म्हणाले. 

देशाची ताकद तरुण पिढी असून, या पिढीनं आराम करण्याऐवजी कामालाच प्राधान्य दिलं पाहिजे. कारण आपण जसजशी प्रगती करत पुढे जाऊ तसतसं आरामाच्या संधी येतच राहतील आणि 2047 मध्ये सध्याची तरुण पिढी, हे बलिदान आणि कार्यक्षमतेचं फायदा घेताना दिसेल.  

 

Related posts