आता खरी दिवाळी; सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात आले हजारो रुपये, Salary Slip पाहिली का?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Government Jobs : दिवाळीचा माहोल आता सर्वत्र पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे या सणाची उत्सुकता नोकरदार वर्गामध्ये जरा जास्तच पाहायला मिळते. निमित्त ठरतंय ते म्हणजे नोकरदार वर्गाला मिळणारा वार्षिक बोनस. अर्थात दिवाळीच्या निमित्तानं मिळणारा आर्थिक लाभ. पगारात येणारी ही वाढीव रक्कम अनेकांनाच दिलासा देऊन जाते. असाच दिलासा आता सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाला आहे. 

दिवाळीआधी कर्मचाऱ्यांच्या खात्यात आलेली रक्कम पाहता, ‘यांचीच खरी दिवाळी’ असं तुम्हीही म्हणाल. सणावाराच्या या दिवसांमध्ये केंद्र सरकारच्या अख्य्तारित येणाऱ्या विभागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खास भेट मिळाली आहे. कारण, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढून 46 टक्क्यांवर पोहोचला आहे. यामध्ये 4 टक्क्यांनी वाढ झाली असून, आता ही वाढ कर्मचाऱ्यांना पगाराच्या रुपात दिसू लागली आहे. 

ऑक्टोबर महिन्याच्या पगारामध्ये कर्मचाऱ्यांना कंपनीकडून 4 टक्के जास्तीच्या महागाई भत्त्याची रक्कम देण्यात आली आहे. तर, दुसरा महागाई भत्ता वर्षाच्या दुसऱ्या सहामाईसाठी लागू करण्यात आला आहे. 

कसा होणार फायदा? 

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढला असून, 1 जुलै 2023 पासून तो लागू होणार आहे. ज्यामुळं जुलैपासून सप्टेंबरपर्यंतचा भत्ता एरियर्सच्या स्वरुपात देण्यात आला. 3 महिन्याच्या एरियर्सचा फायदा सर्व केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना मिळणार आहे. 

नव्या Salary Structure नुसार सध्या महागाई भत्त्याची आकडेमोड करण्यात येत आहे. इथं Level 1 वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रेड पे 1800 रुपये असतो. तर, ट्रॅव्हल अलाऊन्ससुद्धा यामध्ये जोडला जातो आणि अंतिम एरियर निर्धारित केला जातो. 

कसं आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचं Salary Structure ? 

7th pay commission अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पगाराला लेवल 1 पासून 18 पर्यंत विविध स्तरांमध्ये विभागण्यात आलं आहे. यामध्ये महागाई भत्त्याचा हिशोब ग्रेड पे, ट्रॅवल अलाऊन्स या आधारे केली जाते. लेवल 1 मध्ये किमान वेतन 18 हजार रुपयांपासून सुरु होऊन कमाल वेतन 56900 रुपये इतकं असतं. 15, 17 आणि 18 व्या लेवलमध्ये कोणताही ग्रेड पे देण्यात आलेला नाही. 18 व्या लेवलपर्यंत किमान वेतनाचा आकडा  2,50,000 पर्यंत पोहोचतो. 

Related posts