[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
भात खाण्याची योग्य वेळ
काही आरोग्य तज्ञ दुपारी भात खाण्याचा सल्ला देतात. कारण ते म्हणतात की यातून तुम्हाला संपूर्ण दिवसासाठी आवश्यक असलेले कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन मिळते. पण रात्रीच्या जेवणात भात खाणे ही एक मोठी चूक आहे, जी 5 प्रकारच्या लोकांसाठी धोकादायक ठरू शकते.
(वाचा :- झोपण्याआधी अंथरूणात बसून करा ही 4 सोपी कामं, 8 तासानंतर थेट सकाळी येईल जाग, पूर्ण शरीराला मिळतील 5 भन्नाट फायदे)
डायबिटीजचे रुग्ण
हार्वर्ड टी.एच. चॅन यांनी, पांढ-या भाताला हाय ग्लायसेमिक फूड म्हणून ओळखला जातो. म्हणजेच हा असा पदार्थ आहे जो लवकर पचतो आणि रक्तातील साखर झपाट्याने वाढते. यामुळे, टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो असे मानले गेले आहे. ज्या लोकांना आधीच मधुमेह आहे त्यांनी रात्रीचे भाताचे सेवन करणे थांबवावे.
(वाचा :- रात्री उशिरा जेवणा-या लोकांना होतात हे 3 भयंकर आजार, वयाच्या 20 शीतच जडतात 80 वर्षाच्या म्हाता-या लोकांचे आजार)
हृदयविकाराचे रुग्ण
भाताने मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका वाढवतो. या आजारांमध्ये उच्च रक्तातील साखरे व्यतिरिक्त हाय ब्लड प्रेशर, उच्च ट्रायग्लिसराइड आणि गुड कोलेस्ट्रॉल देखील कमी होते. या सर्व समस्यांमुळे हृदयाचे नुकसान होऊन हृदयविकार होतो.
(वाचा :- Papaya Side Effects: पपईसोबत हा पदार्थ खाताक्षणी बनतं भयंकर विष, रक्ताचं बनतं पार पाणी, होतात रक्ताच्या उलट्या)
लठ्ठपणा नको असेल तर
जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर रात्री पांढरा भात खाऊ नका. कारण, झोपण्यापूर्वी यातून तुमच्या शरीराला कार्बोहायड्रेट आणि कॅलरीज मिळतात, ज्यांचा रात्रीच्या वेळी शरीर वापर करत नाही. एकंदर त्या शरीरातच राहतात आणि चरबीच्या रूपात साठवल्या जातात. म्हणूनच लठ्ठपणाने त्रस्त असणाऱ्यांनीही पांढरा भात खाऊ नये.
(वाचा :- Diabetes: दुपारी फक्त हे 1 काम करणा-यांची कधीच वाढत नाही रक्तातील साखर व होत नाही डायबिटीज, शास्त्रज्ञही हैराण)
होऊ शकतो कॅन्सर
जगभरात तांदूळ पिकवला जातो आणि जगभरातील तांदूळ पिकवणारी अशी अनेक ठिकाणे आहेत जी आर्सेनिकने दूषित आहेत. हा घटक शरीरात जास्त पोहोचल्यास कर्करोगाचा धोका वाढतो. त्यामुळे मेंदूच्या कार्यातही घट होऊ शकते.
(वाचा :- विषारी पदार्थ खच्चून भरून आतडी आतून पूर्ण सडवतात रोज न चुकता खाल्ले जाणारे हे 5 पदार्थ, एक तर आहे “गोड विष..”!)
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.
[ad_2]