( प्रगत भारत । pragatbharat.com)
Ashwini Vaishnav On Resignation: ओडिसामधील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताने (Train Accident) संपूर्ण देश हादरला आहे. बालासोरमध्ये तीन रेलगाड्यांच्या धडकेत आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीये, तर 900 हून अधिक लोक जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. येत्या काही तासात मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. अशातच आता रेल्वे अपघात (Odisha train Accident) कशामुळे झाला? नेमकं कारण काय? असे सवाल उपस्थित करत विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच आता रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav) यांनी विरोधकांच्या आरोपावर उत्तर दिलं आहे.
सरकारचे लक्ष केवळ लक्झरी गाड्यांवर आहे. सर्वसामान्यांचे गाड्या आणि ट्रॅक सरकारचं पूर्णपणे दुर्लक्षित आहे. ओडिशातील मृत्यू त्याचाच परिणाम आहेत. रेल्वे मंत्र्यांनी याची जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी केली आहे. त्यावर आश्विनी वैष्णव यांनी विरोधकांना राजकारण न करण्याचा सल्ला दिलाय.
काय म्हणाले आश्विनी वैष्णव?
राजकारण करण्याची ही वेळ नाही. आता जखमी प्रवाशांना दिलासा देण्याची वेळ आली आहे. आमचे सर्व लक्ष बचावावर आहे. पूर्ण ताकदीने काम करत आहे. मी कुठेही जात नाही, असं आश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav On Resignation) यांनी म्हटलं आहे.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या घरच्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये तर गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 2 लाख देण्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. किरकोळ जखमी झालेल्या लोकांना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.
आणखी वाचा – ओडिशाच्या बालासोरमध्ये मृत्यूचं तांडव, बालासोर दुर्घटनेला जबाबदार कोण?
घटनास्थळावरून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav Viral Video) यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ओडिसातील अपघाताचा आढावा घेण्यासाठी रेल्वेमंत्री सकाळी अपघातस्थळी पोहोचले होते. त्यावेळी एका छोट्या जागेतून त्यांनी मार्ग काढला.
पाहा Video
#WATCH | Railways Minister Ashwini Vaishnaw thanks NDRF officials who are actively engaged in the search and rescue operation in #Balasore#OdishaTrainTragedy pic.twitter.com/AcQvmexrr8
— ANI (@ANI) June 3, 2023
दरम्यान, 2017 साली झालेल्या रेल्वे अपघातांनंतर तत्कालिन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू (Suresh Prabhu) यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या रेल्वेमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता आश्विनी वैष्णव यांनी देखील राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.