Free Airport Food Facility on Federal Scapia Co-branded Credit Card;देशातल्या सर्व एअरपोर्टवर खाणं-पीणं फ्री, आराम करण्याची सुविधा; ‘या’ क्रेडीट कार्डबद्दल जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Free Airport Food Facility: आपल्या मोबाईलवर दररोज एका क्रेडीट कार्डची ऑफर आलेली असते. पण खर्चिक बाब म्हणून आपण याकडे दुर्लक्ष करतो. तरीही सध्या अनेकजण क्रेडीट कार्ड वापरणे पसंत करतात. ऐनवेळी अचानक येणाऱ्या खर्चासाठी त्याचा उपयोग होतो. याहून रिवॉर्ड पॉइंट्स आणि मिळणाऱ्या सुविधांचा उपभोग घेता येतो. विशेषत: क्रेडीट कार्डमुळे तुम्हाला विमान प्रवासात मोफत सुविधा मिळत असतील तर? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

विमान प्रवासात कधी फ्लाइटसाठी वाट पाहावी लागेल हे सांगता येत नाही. ही खूप कंटाळवाणी गोष्ट असते. अनेकदा आपण विमानतळावर लवकर जाऊन पोहोचतो. त्यातही लाऊंजमध्ये प्रवेशासाठी अधिकचे पैसे मोजावे लागतात. पण ही सुविधा तुम्हाला विनामूल्य मिळाली तर? हो. हे शक्य आहे.  देशात अशी अनेक क्रेडिट कार्डे आहेत जी विमानतळांवर लाउंज अ‍ॅक्सेस सुविधा देतात 

यामध्ये सहसा वार्षिक 4 किंवा 8 वेळा लाउंज प्रवेशाची कॅपिंग असते. एक असेही क्रेडीट कार्ड आहे, ज्यामध्ये अमर्यादित लाउंज प्रवेशाची सुविधा मिळते. जर तुम्हाला विमानतळावर अमर्यादित लाउंज प्रवेशाची सुविधा हवी असेल, तर फेडरल स्कॅपिया को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड हे एक उत्तम कार्ड ठरु शकते.

फेडरल बँकेने फिनटेक कंपनी स्कॅपियाच्या सहकार्याने हे क्रेडिट कार्ड लॉंच करण्यात आले. हे आजीवन मोफत क्रेडिट कार्ड आहे. या कार्डसाठी कोणतेही सहभागी किंवा वार्षिक शुल्क नाही. हे कार्ड व्हिसा कार्ड स्वीकारणाऱ्या सर्व व्यापारी दुकानांवर किंवा ऑनलाइन वेबसाइटवर वापरले जाऊ शकते, अशी माहिती देण्यात आली आहे.

विमानतळ लाउंज प्रवेशाची सुविधा

लाउंज प्रवेश सुविधा ही विमानतळ प्रशासनाकडून देण्यात येते.  येथे तुम्ही जाऊन तुमचा वेळ घालवू शकता. येथे तुम्ही मोफत मासिक वाचू शकता. येथे जेवणाची व्यवस्था असते. तसेच तुम्ही मोफत वायफाय वापरू शकता. एकदा तुम्ही लाउंजमध्ये प्रवेश केल्यानंतर, तुम्हाला तणावमुक्त राहण्याची संधी मिळते. जर तुम्ही विमानतळावर खूप लवकर पोहोचलात किंवा कनेक्टिंग फ्लाइट्समध्ये बराच वेळ असेल तर, विमानतळ लाउंजमध्ये प्रवेश करणे उपयुक्त ठरते. 

फेडरल स्कॅपिया क्रेडिट कार्डचे फायदे 

या क्रेडिट कार्डद्वारे, तुम्हाला स्कॅपिया अ‍ॅपद्वारे प्रवास बुकिंगवर 20 टक्के स्कॅपिया कॉइन्स  मिळतात.  इतर ऑनलाइन आणि ऑफलाइन खर्चांवर 10 टक्के स्कॅपिया कॉइन्स मिळतात. या कार्डद्वारे आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर कोणतेही विदेशी मुद्रा मार्कअप शुल्क लागणार नाही. तसेच कार्डधारकाला अमर्यादित मोफत डोमेस्टिक एअरपोर्ट लाउंजमध्ये प्रवेश मिळतो.

असे असले तरी यासाठी काही नियम आणि अटी घालून देण्यात आल्या आहेत. त्याबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. लाभ घेण्यासाठी, तुम्हाला फेडरल स्कॅपिया क्रेडिट कार्डद्वारे दरमहा किमान 5,000 रुपये खर्च करावे लागतील. 5 स्कॅपिया नाणी 1 रुपयाच्या बरोबरीची आहेत. तुम्ही स्कॅपिया अॅपवर फ्लाइट आणि हॉटेल्स बुक करण्यासाठी या रिडीम करू शकता.

हे कार्ड कॉन्टॅक्टलेस असून ग्राहकांना ‘टॅप आणि पे’ ची सुविधा देते. म्हणजेच कार्ड स्वाइप न करता फक्त पीओएस मशीनवर टॅप करून पेमेंट केले जाऊ शकते.

Related posts