निर्मला सीतारमण जगातील सर्वात शक्तीशाली महिला; फोर्ब्सच्या यादीत कितव्या स्थानी नाव?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Forbes World’s Most Powerful Womens: फोर्ब्सने (Forbes) जगातील सर्वात शक्तीशाली महिलांची यादी जारी केली आहे. या यादीत भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांच्याही नावाचा समावेश आहे. त्याचबरोबर अन्य तीन महिलांनाही या यादीत स्थान देण्यात आले आहेत. या तिन्ही महिला उद्योजगतातील आहेत. (The World’s Most Powerful Women 2023)

फोर्ब्सने जगातील सर्वात 100 शक्तीशाली महिलांची यादी अलीकडेच जारी केली आहे. या यादीत 32व्या स्थानी निर्मला सीतारमण यांचे नाव आहे. निर्मला सीतारमण या 2019 पासून भारताच्या अर्थमंत्री पदाचा भार सांभाळत आहेत. तसंच, निर्मला सीतारमण या कॉर्पोरेट मंत्रालयाची जबाबदारीही सांभाळतात. अर्थमंत्र्यांसोबतच या यादीत अन्य तीन भारतीयांचे नाव असून त्यांनी उद्योगक्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. HCL Corpच्या CEO रोशनी नादर मल्होत्रा, स्टील ऑथोरीटी ऑफ इंडियाच्या चेअरपर्सन सोमा मंडल आणि बायकॉनच्या अध्यक्ष किरण मजुमदार शॉ यांनीही स्थान पटकावले आहे. कोण आहेत या महिला जाणून घेऊया. 

नाव पद रँक
निर्मला सीतारमण  केंद्रीय अर्थमंत्री 32
रोशनी नादर HCl CEO 60
सोमा मंडल SAIL CEO 70
किरण मजूमदार-शॉ Biocon Founder 76

 

रोशनी नादर

सर्वात शक्तीशाली महिलांच्या यादीत निर्मला सीतारमण यांच्यासोबतच रोशनी नादर मल्होत्रा यांचेही नाव आहे. रोशनी नादर HCl च्या संस्थापक आणि उद्योगपती शिव नादर यांची मुलगी आहे. फोर्ब्सच्या मते, एचसीएल टेक्नोलॉजीच्या सीईओ म्हणून त्या कंपनीची रणनिती आणि जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी जुलै 2020मध्ये त्यांच्या वडिलांनंतर कंपनीची जबाबदारी सांभाळली. 

सोमा मंडल

सोमा मंडल सरकारच्या भागीदारी असलेली कंपनी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL) च्या पहिला महिला अध्यक्षा आहेत. 2021 मध्ये त्यांना ही जबाबदारी मिळाली होती. तेव्हापासून सोमा यांनी घेतलेल्या निर्णयांमुळं कंपनी फायद्यात आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीला पहिल्याच वर्षात तीनपट फायदा झाला. 

किरण मजुमदार-शॉ

फॉर्ब्सच्या यादीत सामील असलेल्या किरण मजुमदार शॉ भारतातील सर्वात श्रीमंत सेल्फ मेड महिलांपैकी एक आहेत. 1978 मध्ये त्यांनी बायोफार्मास्युटिकल फर्म बायोकॉनची स्थापना केली. 

जगातील Top-3 शक्तीशाली महिला कोण?

जगातील सर्वात शक्तीशाली महिलांच्या यादीत यंदा युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी पहिला नंबर मिळवला आहे. तर, दुसऱ्या नंबरवर युरोपीय सेंट्रल बँकच्या अध्यक्षा क्रिस्टीन लेगार्ड या आहेत. तर जगातील तिसरी शक्तीशाली महिला भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरीस आहेत.

Related posts