Viral Video : ‘मी प्रेग्नेंट नाही…’ न्यूज अँकरने Live Tv वर ट्रोलर्सची केली बोलती बंद

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Trending News : आजकाल सोशल मीडियावर प्रत्येक जण आपल्या मनातील गोष्टी मोकळ्यापणाने मांडताना दिसतात. या सोशल मीडियावर फोटो असो व्हिडीओ क्षणात व्हायरल होतात. पण अनेक जण एखादी गोष्ट आवडली नाही किंवा एखाद्या व्यक्तीला विनाकारण आक्षेपार्ह व्यक्त करतात. या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका न्यूज अँकरला तिच्या लूकमुळे काही नेटकऱ्यांनी टार्गेट केलं. पण ही महिला न घाबरता त्या परिस्थितीला समोर जाते आणि लाइव्ह टीव्ही शोमध्ये त्या ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर देते. (I am not pregnant News anchor shuts down trollers on Live Tv video get viral Trending news today)

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. कॅनेडियन न्यूज अँकर लेस्ली हॉर्टनने तिला ईमेल पाठवून ट्रोल करणाऱ्या व्यक्तीला लाईव्ह टीव्हीवर सडेतोड उत्तर दिलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. हॉर्टन तिचा नेहमीचा ट्रॅफिक रिपोर्ट ग्लोबल न्यूज मॉर्निंग कॅल्गरीवर देत असताना ती अचानक म्हणाली की, ‘मला आताच एक ईमेल आला आहे, आणि मला या क्षणीच त्याला उत्तर द्यायचं आहे. एका दर्शकाने मला या मेलमध्ये लिहिलं आहे की, ‘तुझ्या गरोदरपणाबद्दल अभिनंदन…’ हे वाचून हॉर्टन म्हणाली की, ‘धन्यवाद, पण मी गरोदर नाही. गेल्या वर्षी मी कर्करोगामुळे माझं गर्भाशय गमावलं. त्याशिवाय माझ्या वयाच्या स्त्रिया अशाच दिसतात. त्यामुळे, हे तुमच्यासाठी आक्षेपार्ह असेल, तर ते दुर्दैवी आहे.’

शो संपत असताना ती म्हणाली की, ‘ असे ईमेल करण्यापूर्वी थोडा विचार करायला हवा.’ तरदुसरीकडे सोशल मीडियावर नेटकरी हॉर्टनच्या उत्तराचं कौतुक करत आहेत. बॉडी शेमिंगच्या विरोधात उभं राहिल्याबद्दल आणि आत्मविश्वासाने उत्तर दिल्याबद्दल तिची अनेकांनी प्रशंसा करत आहेत.  

कॅनेडियन कॅन्सर सोसायटीने हॉर्टनच्या व्हिडीओवर लिहिलंय, ‘तुम्ही कर्करोग योद्धा आहात आणि सर्वत्र महिलांसाठी चॅम्पियन आहात! तुम्ही जे करत आहात ते करत राहा!’ तर दुसर्‍या यूजरने लिहिलंय की, ‘कर्करोग असो वा नसो, लेस्ली, माझ्या मतं तू चांगली दिसतेस. जर कोणी सकारात्मक बोलत नसेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि पुढे जा. 

सोशल मीडिया आणि डिजिटल मीडियाच्या जमान्यात ऑन-स्क्रीन लोकांमध्ये बॉडी शेमिंगचं प्रमाण वाढलं आहे. सेलिब्रिटी, अॅथलीट आणि अगदी ऑनलाइन सामग्रीमध्ये दिसणारे लोकही अनेकदा शरीराला लज्जास्पद वागणूक देताना दिसतात. यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर आणि स्वाभिमानावर नकारात्मक परिणाम होतो. 

Related posts