Vastu Shastra Tips : घरात पूर्वजांचे फोटो कुठे लावयाचे? तुमची एक चूक आर्थिक संकटाना देऊ शकते निमंत्रण

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Vastu Shastra Tips : हिंदू धर्मात पितृपक्षाला, अमावस्या आणि पौर्णिमेच्या तिथींना पितरांचं श्राद्ध करण्याचा नियम आहे. या तिथीवर पितरांची पूजा केली जाते. श्राद्ध कर्मामध्ये पितरांचं स्मरण करुन अन्नदान केलं जातं. या विधीतून पितर प्रसन्न होतात आणि घरामध्ये सुख, समृद्धी, आनंद आणि शांती नांदते. पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध-विधीद्वारे पितरांना प्रसन्न केलं जातं. आपल्या घरात पूर्वजांचे फोटो असतात. 

कदाचित अनेकांना हे माहिती नसेल की, घरात पूर्वजांचे फोटो ठेवण्यासाठी वास्तूशास्त्रात नियम सांगण्यात आले आहे. तुमची एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. चुकीच्या पद्धतीने पूर्वजांचे फोटो लावल्यास घरात पितृदोष किंवा आर्थिक संकट कोसळतं. चला तर मग आज आपण जाणून घेणार आहोत, पूर्वजांच्या फोटोबद्दलचे नियम. (vastu tips suitable or ancestors the wrong place at home Pitra Dosh and financial crisis lose money)

चुकूनही पूर्वजांच्या फोटोबद्दल करु नका!

खरं तर वास्तूशास्त्र तज्ज्ञांच्या मते घरामध्ये पितरांचे किंवा पूर्वजांचे फोटो फार अशुभ मानले जाते. पण हिंदू धर्मात पूर्वजांच्या फोटोला महत्त्व आहे. शिवाय त्याच्याशी भावनिक नातं जोडलं आहे. 

त्यामुळे तुमच्या घरात पूर्वजांचे फोटो असेल तर ते कधीही भिंतीवरील खिळ्याला लटकवून ठेवू नये. तर वास्तूशास्त्रानुसार हे फोटो एका लाकडी स्टँडवर किंवा टेबलवर ठेवावा. 

वास्तूशास्त्रानुसार घरामध्ये पूर्वजांचे एकापेक्षा जास्त फोटो नकोत. एकापेक्षा जास्त फोटो असल्यास घरात नकारात्मक ऊर्जा वास करते. 

वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर किंवा मुख्य दरवाज्याचा समोरील भींतीवर लावू नयेत. 

वास्तुशास्त्रानुसार घराच्या मंदिरात पूर्वजांची फोटो लावू नयेत. मंदिर आपण देवाची पूजा करतो आणि पितरांचे स्थान देखील सर्वोत्तम मानले जाते. पण तरीदेखील मंदिरात पूर्वजांची फोटो ठेवू नयेत. मंदिरात नकारात्मक उर्जेचा प्रभाव दिसतो.  

वास्तुशास्त्रात बेडरूम, स्वयंपाकघर आणि घराच्या मध्यभागी पितरांचे फोटो चुकूनही लावू नये, अन्यथा वास्तुदोष निर्माण होतो. 

गेलेल्या व्यक्तीची आठवण म्हणून त्यांच्यासोबत काढलेले फोटो तर चूक घरात लावू नका. 

घरात कुठल्या दिशेनला असावे पूर्वजांचा फोटो?

वास्तूशास्त्रात घरातील दिशांना अतिशय महत्त्व आहे. या शास्त्रानुसार दक्षिण दिशा अतिशय शुभ असल्याने सकाळी उठल्यावर दक्षिण दिशेला तोंड करुन नमस्कार कराला हवा. शास्त्रानुसार ही दिशा यमाची आहे अशी मान्यता आहे. तर उत्तर दिशेला पूर्वज राहतात असं मानलं जातं. म्हणूनच उत्तर दिशेच्या भिंतींवर पूर्वजांची फोटो लावावीत. असं केल्याने आयुष्यातील संकट नाहीसे होतात आणि अकाली मृत्यूची भीतीही दूर होते. 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही.) 

Related posts