( प्रगत भारत । pragatbharat.com)
Mukesh Ambani Isha Ambani : (Reliance ) रिलायन्स उद्योग समुहानं व्यवसाय क्षेत्रात एक उंची गाठलेली असतानाच आता मुकेश अंबानी हे त्यांच्या पुढच्या पिढीला या क्षेत्रातील प्रगतीपथावर चालण्यासाठी तयार करताना दिसत आहेत. अंबानी यांची मुलं, अनंत आणि आकाश अंबानी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहेत. त्यात अंबानी यांची लेक, ईशासुद्धा मागे नाही.
ईशा अंबानीच्या नेतृत्त्वाखाली पुढे जाणाऱ्या आणि 1860000 कोटी रुपयांची उलाढाल असणाऱ्या रिलायन्स रिटेलकडून सध्या या क्षेत्रामध्ये काही मोठे आणि तितकेच महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. ईशानं बऱ्याच काळापासून या कंपनीच्या कक्षा रुंदावण्यासाठी सातत्यानं आणि प्रकर्षानं प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या कंपनीकडून अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँडशी हातमिळवणीसुद्धा करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या करारांमुळं अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड भारतात पोहोचले आहेत.
ईशाच्या या प्रयत्नांना आता आणखी यश मिळणार आहे कारण, आता तिच्या कंपनीकडून Allies of Skin भारतात येणार आहे. एका प्रसिद्ध वृत्तसमुहानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आता Allies of Skin ची उत्पादनं भारतात अनेक स्टोअर आणि रिलायन्स रिटेलच्या (Reliance Retail) टीरा या अॅपवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.
Tira नेमकं आहे तरी काय?
Tira हा रिलायन्सनं लाँच केलेला एक नवा ब्युटी ब्रँड अर्थात सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादनांची विक्री करणारा ब्रँड आहे. ईशा अंबानींच्या नेतृत्तवाखाली या ब्रँडनं Nykaa, Tata Cliq Palette, Myntra आणि इतर ब्रँडशी असणाऱ्या स्पर्धेत पाय घट्ट रोवले आहेत. मागील काही महिन्यांपासून टिराकडून त्यांच्या पोर्टफोलिओवर अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड जोडण्यात आले असून, त्यात नव्यानं Allies of Skin ची भर पडली आहे.
सध्या रिलायन्स त्यांच्या कथित IPO च्या दिशेनं वाटचाल करत असतानाच टियर 1 आणि 2 शहरांमध्ये व्यवसाय वाढवण्यासाठीच कंपनीकडून विविध पावलं उचलली जात आहेत. मुकेश अंबानी यांनी रिलायन्स रिटेलची सूत्र ईशा अंबानीच्या हाती सोपवल्यानंतर या व्यवसायाची दुपटीनं वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.
सध्याच्या घडीला रिलायन्स रिटेलमध्ये 2.5 लाख कर्मचारी काम करतात. Jimmy Choo, Georgio Armani, Hugo Boss, Versace, Michael Kors, Brooks Brothers, Armani Exchange, Burberry या आणि अशा अनेक ब्रँडना रिलायन्स रिटेलनं भारतात आणलं असून, त्यांची देशभरात अनेक दुकानं असून, त्यातून जवळपास 100 कोटी रुपयांचा व्यवसाय होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे जगातील Top 10 रिटेलरच्या यादीत रिलायन्सचा स्थान असून जागतिक स्तरावरील पहिल्या 100 कंपन्यांच्या यादीतही रिलायन्स रिटेलचं नाव आहे. लेकीनं इतक्या कमी वयात तिला नेमून दिलेलं काम इतक्या कमालीनं पूर्ण करत नवनवीन यशशिखरं गाठलेलं पाहून मुकेश अंबानी यांनाही अभिमान वाटत असेल!