अभ्यासाला वैतागून घर सोडलं; मुंबईत येऊन मोठा माणूस बनला, 6 वर्षांनी मुलाची अवस्था पाहून पोलिसही थक्क

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mumbai News Today: अभ्यासात फारसा रस नव्हता. पण आई-वडिल सतत दबाव टाकत होते. कोचिंग क्लासला जाण्यासाठी सतत पाठीस लागत होते. मात्र तो बहाणे बनवून आभ्यास न करण्यासाठी टाळाटाळ करायचा. याच कारणामुळं वडिलांकडून खूप मारदेखील खाल्ला. या सगळ्याला वैतागून त्याने घर सोडलं. दहावीत असताना तो घर सोडून निघून गेला. मात्र आता तब्बल 6 वर्षांनंतर या मुलाला शोधून काढण्यात यश आलं आहे. पोलिसांनी मुलाला शोधून काढले 10वीत असताना घर सोडून पळून गेलेला मुलगा मुंबईत येऊन मोठा माणूस झाला होता. एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशी ही गोष्ट आहे. 

आशू राजपूत असं या मुलाचं नाव आहे. 2018मध्ये आशू राजपूत दहावीत शिकत होता. आशूचे लक्ष आभ्यासात लागत नव्हते आणि त्यामुळंच त्याला घरातून भरपूर मार बसायचा. आई-वडिल जेव्हा त्याला ट्यूशनला जाण्यासाठी सांगायचे तेव्हा तो बहाणे शोधून तिथून पळून जायचा. त्यामुळंच आशुचे वडिल महेंद्र तिच्यावर सतत नाराज राहायचे आणि त्यामुळं त्याला मारही खावा लागत असे. 

वडिलांच्या हातून सतत मार खावा लागत असल्यामुळं आशू त्यांच्यावर नाराज राहत असे. त्यामुळंच सप्टेंबर 2018 मध्ये त्याने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला. आई-वडिल त्याला जीव तोडून शोधत होतो. मात्र, त्याचा कुठेच पत्ता सापडला नाही. शेवटी आई-वडिलांनी ग्वालियरयेथील हजीरा ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी आशूचा शोध सुरू केला होता. तसंच, बेपत्ता आशूचा जो कोणी माहिती देईल त्याला 10 हजार रुपये बक्षीस देण्याची घोषणादेखील केली होती. मात्र, तरीही त्याचा काही उपयोग झाला नाही. 

ग्वालियर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ऑपरेशन मुस्कान अंतर्गंत पुन्हा एकदा आशूचा तपास करण्यास सुरूवात केली. पोलिसांनी आशूच्या आधार कार्ड मोबाईल सीम अॅक्टिव्ह असल्याची माहिती मिळाली. आधार कार्डच्या आधारे त्यांनी आशूची माहिती मिळवली. सीम ट्रेस करत पोलिस मुंबईला पोहोचले. तेव्हा आशूचा पाहून तेदेखील काही क्षण थक्क झाले. कारण पोलिसांना ज्या अवस्थेत आशू सापडला ते पाहून त्यांनाही धक्का बसला. कारण आशू मोठा माणूस बनला असून तो प्रत्येक महिना लाखो रुपये कमवत होता. 

पोलिसांनी जेव्हा आशूला 6 वर्षे कुठे होतास याबद्दल विचारले तेव्हा त्याने सांगितले की, तो घरातून पळून थेट कानपूर येथे पोहोचला. तिथे साधारण 7 महिने त्याने हॉटेलमध्ये काम केले. त्यानंतर कानपूरहून नोएडाला पोहोचला. तिथेही 4 महिने राहिला. नंतर त्याने मुंबई गाठली. तिथे काही मित्र बनवले व त्यांच्या मदतीने त्याने त्याचे करिअर सेट केले. 

मुंबईत आल्यानंतर आशूने कॉल सेंटर आणि हॉटेलमध्ये काम केले. या पैशातून त्याने त्याचे पुढचे शिक्षण घेतले. पदवी मिळाल्यानंतर त्याला रियल इस्टेटबद्दल माहिती मिळाली आणि त्याने एक कंपनी जॉइन केली. आता आशू याच रियल इस्टेट कंपनीत नोकरी करुन महिन्याला 2-3 लाख रुपये कमावतो.

मुंबईतील अंधेरी परिसरात राहणाऱ्या आशूची लाफइस्टाइल पूर्ण बदलली आहे. पोलिस त्याला घेऊन ग्वालियरला घेऊन गेले आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेटवले. 6 वर्षांनंतर मुलाला पाहून कुटुंबीयांना खूप आनंद झाला. त्याच्या आईने तर मुलाला इतक्या वर्षांनी पाहिल्यानंतर तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. आपल्या आईला रडताना पाहून आशूच्याही डोळ्यात पाणी आले. 

Related posts