Success Story Tariq Ajim Premji Wipro Marathi News;BPO तील कामाने करिअरची सुरुवात, वडिलांकडून गिफ्ट मिळाले 2500000000 किंमतीचे शेअर्स

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Success Story Tariq Premji: वडील देशातील मोठे उद्योजक पण त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर बीपीओमध्ये काम करण्याला प्राधान्य दिले. मेहनत करत राहिला. एक दिवस वडिलांनी तब्बल 2500000000  किंमतीचे म्हणजेच 250 कोटी रुपयांचे शेअर्स आपल्या तरुण मुलाला गिफ्ट केले. आज तो तरुण मोठ्या उद्योग व्यवसायाचा मालक बनलाय. याबद्दल जाणून घेऊया. 

अझीम प्रेमजी हे जगभरातील सर्वात प्रसिद्ध भारतीय अब्जाधीशांपैकी एक आहेत. स्वत:च्या उद्योगाप्रती त्यांची असलेली दृष्टी, व्यावसायिक नीतिमत्ता आणि परोपकारासाठी ते विशेष करुन ओळखले जातात. भारतातील सर्वात दानशूर व्यक्ती म्हणून अझीम प्रेमजी यांची ओळख करुन दिली जाते. त्यांनी उदार मनाने केलेल्या देणग्यांची वारंवार चर्चा होत असते. त्यांच्या अशाच दानाची कहाणी नेहमी सांगितली जाते. त्यांनी गिफ्ट केलेली मोठी रक्कम हे त्यामागचे कारण आहे. 

अझीम प्रेमजी यांनी विप्रोचे 250 कोटी रुपयांचे शेअर्स आपल्या प्रत्येक मुलाला भेट म्हणून दिले आहेत. अझीम प्रेमजी यांनी प्रत्येकी 51 लाख15 हजार 090 रुपये किंमतीचे शेअर्स मुलांना दिले. त्यांचा मोठा मुलगा रिशाद सध्या विप्रोचा अध्यक्ष आहे. तर तारिक हे अझीम प्रेमजी फाउंडेशनमध्ये कार्यरत आहे. 

अझीम प्रेमजींचा मोठा मुलगा रिशाद हा अनेकदा प्रसिद्धीच्या झोतात असल्याचे आपण पाहिले असेल. पण अझीम प्रेमजी फाऊंडेशन जे परोपकारी उपक्रम करते, त्यामागे कोण आहे? तुम्हाला माहिती आहे का? अझीम प्रेमजी फाऊंडेशनचे सर्व्हेसर्व्हा तारिक प्रेमजी यांच्याबद्दल अनेकांना माहिती नसेल.तारिक प्रेमजी हे विप्रो एंटरप्रायझेसचे नॉन एक्झिक्युटीव्हचे संचालक आहेत. ज्यांच्या छत्राखाली विप्रो कंझ्युमर केअर आणि लाइटिंग आणि विप्रो इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग आहे. ही उपकंपनी विप्रोचा एक भाग आहे. ही कंपनी भारतातील आघाडीच्या आयटी कंपन्यांपैकी एक असून हिचे मार्केट कॅप 2 लाख 46 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

तारिक प्रेमजी हे 2016 पासून विप्रो साम्राज्याचे दोन मुख्य पिलर संभाळत आहेत. वडिलांनी दिलेली जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या संभाळली आहे. ते अझीम प्रेमजी फिलान्थ्रोपिक इनिशिएटिव्ह आणि अझीम प्रेमजी फाउंडेशनच्या संचालक मंडळावर ते कार्यरत आहेत. तारिक हे अझीम प्रेमजी एंडॉवमेंट फंडचे उपाध्यक्ष देखील आहेत. अझीम प्रेमजी यांनी इतरांना सहाय्य करण्याच्या हेतूने विविध उपक्रमांना निधी देण्यासाठी स्थापन केलेली ही संस्था आहे. या फंडाच्या गुंतवणूक प्रक्रियेची स्थापना आणि संस्थात्मकीकरण करण्यात तारिक प्रेमजी यांचा मोलाचा वाटा आहे. यामुळे अनेकांना मदत होत असते. 

तारिक प्रेमजी यांनी सेंट जोसेफ कॉलेज, बंगळुरू विद्यापीठातून वाणिज्य पदवी घेतली. वडील मोठे व्यावसायिक असले तरी तारिक हे साऱ्या मायाजाळापासून दूर होते. त्यांनी स्वत:च्या हिमतीवर काम शोधणे सुरु केले. याचाच एक भाग म्हणून त्यांनी काही काळ बीपीओमध्ये काम केले. त्यानंतर ते प्रेमजी इन्व्हेस्टमध्ये रुजू झाले. ते आता कार्यालयाच्या गुंतवणूक मॅनेजमेंटमध्ये काम करतात. ही समिती 5 अब्ज मालमत्तेच्या व्यवस्थापनाची देखरेख करते.

Related posts