Sankashti Chaturthi 2024 : ‘या’ दिवशी आहे वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजाविधी

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sankashti Chaturthi 2024 : हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला अतिशय महत्त्व असून आठवड्यातील प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आला आहे. मंगळवार, बुधवार हा गणरायाला समर्पित वार आहे. त्याशिवाय पंचांगानुसार प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. चतुर्थी हा बाप्पाला समर्पित असू यादिवशी गणरायाला प्रसन्न करण्यासाठी व्रत केल जात. या चतुर्थीला लंबोदर संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखलं जातं. (Sankashti Chaturthi 2024 or lambodara sankashti chaturthi puja vidhi know puja samagri list mantra Sakat Chauth)

या वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी कधी?

पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी 29 जानेवारी 2024 ला असून 30 जानेवारीपर्यंत असणार आहे.
संकष्टी चतुर्थी तिथी – 29 जानेवारी 2024 ला सकाळी 6.10 पासून 30 जानेवारीला सकाळी 8.54 वाजेपर्यंत
चंद्रोदयाची वेळ – रात्री 09 वाजून 10 मिनिटांनी

100 वर्षांनी दुर्मिळ योग!

शोभन योग – 28 जानेवारी 2024 ला सकाळी 08 वाजून 51 मिनिटापासू 29 जानेवारी 2024 ला सकाळी 09 वाजून 44 मिनिटांपर्यंत
त्रिग्रही योग – या दिवशी मंगळ, शुक्र आणि बुध धनु राशीत त्रिग्रही योग निर्माण करणार आहे.

उपाय – या शुभ योगात गणेशाची सेंदुर आणि दुर्वा अर्पण करुन पूजा केल्यास तिन्ही ग्रहांची कृपा तुम्हाला प्राप्त होईल.

संकष्टी चतुर्थी पूजाविधी 

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर पूजास्थळी चौरंगावर गणपतीची मूर्ती आणि लक्ष्मीची मूर्तीची स्थापना करा. देवाला रोळी, अक्षता, फुलं, दुर्वा, मोदक अर्पण करा. या दिवशी तिळाचं महत्त्व अधिक असल्याने गणपतीला तिळाचे लाडू अर्पण करणे शुभ ठरते. पूजेदरम्यान ओम गं गणपतये नम: मंत्राचा जप आवश्य करा. त्यानंतर गणपतीची आरती करा आणि रात्री चंद्राला अर्घ्य देऊन उपवास सोडा. 

संकष्टी चतुर्थी मंत्र

1. वक्र तुंड महाकाय, सूर्य कोटि समप्रभ: ।

निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा ।।

2. गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारु भक्षणम्ं ।

उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् ।।

3. एकदन्तं महाकायं लम्बोदरगजाननम्ं ।

विध्ननाशकरं देवं हेरम्बं प्रणमाम्यहम् ।।

4. सर्वाज्ञाननिहन्तारं सर्वज्ञानकरं शुचिम् ।

सत्यज्ञानमयं सत्यं मयूरेशं नमाम्यहम् ।।

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts