Electoral Bonds: निवडणूक रोख्यांची अपूर्ण माहिती दिल्याने सुप्रीम कोर्टाने SBI ला फटकारलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) निवडणूक रोख्यांबाबत अपूर्ण माहिती दिल्याने सुप्रीम कोर्टाने स्टेट बँक ऑफ इंडियाला फटकारलं आहे. कोणी कोणत्या पक्षाला रक्कम दिली हे जाहीर करावं असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने स्टेट बँक ऑफ इंडियाला सोमवारपर्यंत वेळ दिला आहे. सुप्रीम कोर्टात निवडणूक रोख्यांसंबंधी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे.  सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी निदर्शनास आणून दिलं की, एसबीआयने जो डेटा सोपवला आहे त्यावर बाँड नंबर देण्यात आलेला नाही. एसबीआयने बाँड क्रमांकाचाही खुलासा करायला हवा होता असं सांगितलं. यावर निवडणूक आयोगाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी युक्तिवाद केला की, सुनावणीदरम्यान सर्वोच्च…

Read More

अझीम प्रेमजींच्या ‘विप्रो’ने CFO पदाची जबाबदारी सोपवलेल्या अपर्णा अय्यर आहेत तरी कोण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Who Is Aparna Iyer: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतामधील आघाडीची कंपनी असलेल्या अझीम प्रेमजी यांच्या ‘विप्रो’ने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुख्य आर्थिक अधिकारी म्हणजेच चीफ फायनॅनशिएल ऑफिसर (सीएफओ) पदावर ‘विप्रो’ने एका महिलेला नियुक्त केलं आहे. ‘विप्रो’सारख्या मोठ्या कंपनीमध्ये जबाबदारीचं हस्तांकरण होतं तेव्हा त्याबद्दल आधी कॉर्परेट क्षेत्रात दबक्या आवाजात चर्चा असते. मात्र या महिलेची नियुक्ती ही अगदीच अचानक करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे कॉर्परेट क्षेत्रात ‘विप्रो’च्या या निर्णयाची चर्चा आहे. ‘विप्रो’ने ज्या महिलेच्या खांद्यावर ही मोठी जाबबदारी सोपवली आहे त्या महिलेचं नाव आहे अपर्णा अय्यर! ‘विप्रो’चे विद्यमान…

Read More