Electoral Bonds: निवडणूक रोख्यांची अपूर्ण माहिती दिल्याने सुप्रीम कोर्टाने SBI ला फटकारलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) निवडणूक रोख्यांबाबत अपूर्ण माहिती दिल्याने सुप्रीम कोर्टाने स्टेट बँक ऑफ इंडियाला फटकारलं आहे. कोणी कोणत्या पक्षाला रक्कम दिली हे जाहीर करावं असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने स्टेट बँक ऑफ इंडियाला सोमवारपर्यंत वेळ दिला आहे. सुप्रीम कोर्टात निवडणूक रोख्यांसंबंधी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे.  सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी निदर्शनास आणून दिलं की, एसबीआयने जो डेटा सोपवला आहे त्यावर बाँड नंबर देण्यात आलेला नाही. एसबीआयने बाँड क्रमांकाचाही खुलासा करायला हवा होता असं सांगितलं. यावर निवडणूक आयोगाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी युक्तिवाद केला की, सुनावणीदरम्यान सर्वोच्च…

Read More

'राम रहीमला पॅरोल देण्याआधी आमची परवानगी घ्यायची,' हायकोर्टाने हरियाणा सरकारला फटकारलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला (Dera Sacha Sauda chief Gurmeet Ram Rahim) सतत दिल्या जाणाऱ्या पॅरोलविरोधात पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने (Punjab Haryana Government) नाराजी जाहीर केली आहे. आम्हाला विचारल्याशिवाय राम रहिमला पॅरोल द्यायचा नाही असा आदेशच कोर्टाने दिला आहे.   

Read More

रुग्णालयातील उपचाराचा रेट ठरवा, अन्यथा आम्ही…; सुप्रीम कोर्टाने फटकारलं; प्रायव्हेट रुग्णालयासंबंधी मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Supreme Court on Private Hospitals: सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांवरील उपचारादरम्यान मनमानीपणे पैसे वसूल केले जात असल्याने नाराजी जाहीर केली आहे. सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान केंद्र सरकारवर ताशेरे ओढत नाराजी जाहीर केली आहे. 14 वर्ष जुन्या ‘क्लिनिकल एस्टेब्लिशमेंट (Central Government)’ नियमांना लागू करण्यात केंद्र सरकार असमर्थ ठरल्यानेही कोर्टाने नाराजी दर्शवली. दरम्यान रुग्णालयाच्या दरांमध्ये मोठी तफावत निदर्शनास आणून दिल्यानंतर, कोर्टाने केंद्र सरकारला तातडीने कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. तसंच सर्व राज्यांमधील वैद्यकीय उपचारांचे दर प्रमाणित करण्याचं आवाहन केलं आहे. ‘वेटेरन्स फोरम फॉर ट्रान्सपरन्सी इन पब्लिक…

Read More

‘त्यांना कोणातरी समजवून सांगा की…’, सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना फटकारलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. यादरम्यान सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना फटकारलं आहे. राहुल नार्वेकर निर्णय घेण्यास उशीर करत असल्याने सुप्रीम कोर्टाने नाराजी जाहीर केली आहे. त्यांना कोणीतरी समजावून सांगावे की, त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा आदर करावा अशा शब्दांत सरन्यायाधीशांनी खडे बोल सुनावले आहेत. आम्हाला मंगळवारपर्यंत वेळापत्रक द्या, अन्यथा आदेश जाहीर करु असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. मंगळवारी याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.  आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात जयंत पाटील आणि सुनिल प्रभू यांनी केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली. कपिल सिब्बल यांनी युक्तिवादाला सुरुवात केली…

Read More

“तुम्ही काय देशातील लोकांना मूर्ख समजता का?”, कोर्टाने आदिपुरुषच्या निर्मात्यांना फटकारलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Adipurush Controversy: आदिपुरुष (Adipurush) चित्रपटावरुन वाद सुरु असतानाच अलाहाबाद हायकोर्टाने (Allahabad High Court) संवादांवरुन निर्मात्यांना फटकारलं आहे. चित्रपटातील संवादावरुन प्रेक्षकांचा एक मोठा वर्ग नाराज असून, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे. कोर्टात आदिपुरुष चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाने खडे बोल सुनावले. तसंच कोर्टाने सहलेखक मनोज मुंतशीर शुक्ला यांना या प्रकरणात पक्षकार बनवण्याचे निर्देश दिले आहेत. कोर्टाने त्यांना एका आठवड्यात उत्तर देण्याचा आदेश दिला आहे. “चित्रपटातील संवाद हे फार मोठं प्रकरण आहे. आपल्यासाठी रामायण फार पवित्र…

Read More