‘….इतकं समजत नसेल तर पंतप्रधान कसे होणार?,’ राहुल गांधी भेटीनंतर संतापले होते प्रणव मुखर्जी, ‘यांना साधा AM आणि PM…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या आयुष्यावर आधारित पुस्तक प्रकाशित झालं असून यामधून त्यांच्या खासगी आणि राजकीय आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे. प्रणव मुखर्जी यांची मुलगी आणि काँग्रेसच्या प्रवक्त्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी आपल्यातील वडील आणि मुलीचं नातं कसं होतं याचाही उलगडा केला आहे.  इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत, काँग्रेसच्या प्रवक्त्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपलं  पुस्तक ‘In Pranab, My Father: A Daughter Remembers’ यावर चर्चा केली. यावेळी त्यांनी प्रणब मुखर्जी आणि राहुल गांधी यांच्यातील एक भेटीचा…

Read More

समजूत काढायला गेलेल्या अधिकाऱ्यालाच जाळायला लावला शेतातील भुसा; पंजाबमधील प्रकार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Punjab Crime : पंजाबसह दिल्लीच्या आजूबाजूच्या परिसरात काही भागात शेतातील पेंढा आणि खुंटं जाळल्याने दरवर्षी दिल्लीमध्ये प्रदूषणात चिंताजनक वाढ होत असते. वारंवार कारवाई करुन देखील शेतकरी पेंढा जाळतच असतात. यंदाच्या वर्षीदेखील पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात भुसा जाळण्याचे प्रकार सुरु आहेत. अशातच पंजाबमधील भटिंडा येथे शेतातील पेंढा जाळणाऱ्यांना थांबवण्यासाठी आलेल्या सरकारी अधिकाऱ्याला शेतकऱ्यांनी घेराव घातला. शेतकऱ्यांनी अधिकाऱ्याला ओलीस ठेऊन शेतातील पेंढा पेटवून दिला आणि नंतर त्याला सोडून दिले. शेतकऱ्यांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला. यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या संपूर्ण घटनेबाबत नाराजी व्यक्त केली…

Read More

“तुम्ही काय देशातील लोकांना मूर्ख समजता का?”, कोर्टाने आदिपुरुषच्या निर्मात्यांना फटकारलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Adipurush Controversy: आदिपुरुष (Adipurush) चित्रपटावरुन वाद सुरु असतानाच अलाहाबाद हायकोर्टाने (Allahabad High Court) संवादांवरुन निर्मात्यांना फटकारलं आहे. चित्रपटातील संवादावरुन प्रेक्षकांचा एक मोठा वर्ग नाराज असून, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे. कोर्टात आदिपुरुष चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाने खडे बोल सुनावले. तसंच कोर्टाने सहलेखक मनोज मुंतशीर शुक्ला यांना या प्रकरणात पक्षकार बनवण्याचे निर्देश दिले आहेत. कोर्टाने त्यांना एका आठवड्यात उत्तर देण्याचा आदेश दिला आहे. “चित्रपटातील संवाद हे फार मोठं प्रकरण आहे. आपल्यासाठी रामायण फार पवित्र…

Read More