अझीम प्रेमजींच्या ‘विप्रो’ने CFO पदाची जबाबदारी सोपवलेल्या अपर्णा अय्यर आहेत तरी कोण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Who Is Aparna Iyer: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतामधील आघाडीची कंपनी असलेल्या अझीम प्रेमजी यांच्या ‘विप्रो’ने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुख्य आर्थिक अधिकारी म्हणजेच चीफ फायनॅनशिएल ऑफिसर (सीएफओ) पदावर ‘विप्रो’ने एका महिलेला नियुक्त केलं आहे. ‘विप्रो’सारख्या मोठ्या कंपनीमध्ये जबाबदारीचं हस्तांकरण होतं तेव्हा त्याबद्दल आधी कॉर्परेट क्षेत्रात दबक्या आवाजात चर्चा असते. मात्र या महिलेची नियुक्ती ही अगदीच अचानक करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे कॉर्परेट क्षेत्रात ‘विप्रो’च्या या निर्णयाची चर्चा आहे. ‘विप्रो’ने ज्या महिलेच्या खांद्यावर ही मोठी जाबबदारी सोपवली आहे त्या महिलेचं नाव आहे अपर्णा अय्यर! ‘विप्रो’चे विद्यमान…

Read More

एलन मस्क यांच्या कंपनीची आर्थिक नाडी भारतीयाच्या हाती; वैभव तनेजा ‘टेस्ला’चे नवे CFO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tesla Appoints Vaibhav Taneja As CFO: इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी अशलेल्या टेस्लाने भारतीय वंशाच्या व्यक्तीवर एक प्रमुख जबाबदारी सोपवली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्क यांच्या मालकीच्या ‘टेस्ला’ने वैभव तनेजा यांची चीफ फायनॅनशिएल ऑफिसर म्हणजेच सीएफओ म्हणून नियुक्ती केली आहे. तनेजा हे त्यांच्या व्यवस्थापनाबरोबर योग्य आर्थिक नियोजनासाठी ओळखले जातात. वैभव तनेजा यांच्या नियुक्तीमुळे गुगलचे सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला यांच्या पंक्तीमध्ये आणखीन एका भारतीयाचा समावेश झाला आहे. वैभव तनेजांच्या हाती टेस्लासारख्या महत्त्वाच्या कंपनीची जबाबदारी आल्याने भारताचा शिरपेचात मानाचा तुरा खोवला…

Read More