शहीद जवानाची इच्छा पूर्ण करण्यासाठी सगळा गाव एकवटला, 24 तासात बांधला 500 मीटर रस्ता

( प्रगत भारत । pragatbharat.com) हिमाचल प्रदेशमधील शिमला येथे शहीद जवानाप्रती आपला सन्मान व्यक्त करताना ग्रामस्थांनी एक असं उदाहरण उभं केलं आहे, ज्याची सगळ्याकडे चर्चा रंगली आहे. ग्रामस्थांनी शहीद जवानाच्या अंत्ययात्रेसाठी स्मशानापर्यंत रस्ता बांधला. इतकंच नाही तर त्यासाठी त्यांनी आपल्या जमिनीही दान केल्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ग्रामस्थांनी फक्त 24 तासांत गावकऱ्यांनी रस्ता उभा केला. या रस्त्याला शहीद जवानाचं नाव देण्यात आलं आहे. शहीद जवानाची गावापासून ते स्मशानापर्यंत रस्ता बांधला जावा, जेणेकरुन अंत्ययात्रेदरम्यान लोकांना त्रास होणार नाही अशी इच्छा होती.  लडाखमध्ये जवान शहीद तीन दिवसांपूर्वी लडाखमध्ये एका वाहनाचा अपघात झाला होता.…

Read More

अमेरिकेच्या मत्तेदारीविरोधात एकवटले ‘ते’ 40 देश? BRICS मुळे महासत्तेचं धाबं का दणाणलं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) 40 Countries Wanted To Join BRICS: दक्षिण आफ्रिकेमध्ये आज म्हणजेच 22 जून 2023 पासून ब्राझील, रशिया, भारत, दक्षिण आफ्रिका आणि चीन या 5 देशांच्या ‘ब्रिक्स’ राष्ट्रांच्या परिषदेला सुरुवात होत आहे. या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही आज पहाटे दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले आहेत. जगातील अर्धाहून अधिक लोकसंख्या असलेल्या या 5 देशांची यंदाची परिषद अधिक खास असणार आहे कारण या 5 देशांच्या संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी जगातील तब्बल 40 देशांनी रस दाखवला आहे. जागतिक स्तरावरील चलन म्हणून डॉलरऐवजी आपआपल्या चलनांना मान्यता देण्याचा प्रयत्न या देशांकडून…

Read More