भीषण स्फोटानंतर घराच्या अक्षरश: चिंधड्या, कॅमेऱ्यात कैद झाला क्षण; 5 ठार आणि 3 जखमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेत एका घऱात भीषण स्फोट होऊन 5 जण ठार झाले आहेत. स्फोट इतका भीषण होता की, आजुबाजूची तीन घरांचंही त्यात नुकसान झालं आहे. हा स्फोट कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्यातून तो किती भयानक होता याची कल्पना येत आहे. शनिवारी सकाळी पिट्सबर्गच्या बाहेरील निवासी उपनगरात ही घटना घडली. रस्त्याच्या पलीकडे असलेल्या एका घरातील कॅमेऱ्यात कैद झालेल्या या स्फोटात घराच्या अक्षरश: चिंधड्या उडत असल्याचं दिसत आहे.  ट्विटरला या स्फोटाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये दिसत आहे त्यानुसार, स्फोटानंतर आगीचा एक मोठा गोळा हवेत दिसत असून त्यानंतर…

Read More

मध्य प्रदेशात कायद्याच्या चिंधड्या, तरुणाला निर्वस्त्र करत बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : मध्य प्रदेशात (MP Crime) सातत्याने अत्याचाराच्या विविध घटना समोर येत आहे. एका मजुरावर भाजप (BJP) नेत्याने लघवी केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता एका व्यक्तीला निर्वस्त्र करुन बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात (Sagar) एका व्यक्तीला नग्न करुन काही लोकांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यानंतर पोलिसांनी (MP Crime) अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कथित व्हिडिओमध्ये, काही लोक चोरीचा आरोप करत त्या व्यक्तीला लाठ्या आणि पाईपने मारहाण करताना दिसत आहेत. मध्यप्रदेशातील निवडणुका जसजशा जवळ येत आहेत,…

Read More