”घरी ये, मी एकटीच आहे” विवाहित प्रेयसीच्या मेसेजनंतर तो घरी पोहोचला, ते दोघे त्या अवस्थेत असताना…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Viral News : सोशल मीडियाचा वाढता वापर आणि त्यातून होणारी मैत्री, प्रेम यातून फक्त अन् फक्त धोका मिळतो. असं एक प्रकरण समोर आलं ते ऐकून तुम्ही हैराण व्हाल. झालं असं की, एका तरुणाचं इन्स्टाग्रामवरुन एका विवाहित महिलेशी ओळख झाली. दोघांचं बोलणं सुरु झालं, त्यांच्यामध्ये मैत्री वाढत गेली. या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. रोज त्यांचे गोड गोड मेसेज सुरु होते. इन्स्टाग्रामची (instagram) ही ओळख एकेदिवशी त्यांचा अंगाशी आली.

‘घरी ये. आज मी एकटी आहे’ 

आता हे दोघे आतुर होते भेटण्यासाठी…तो दिवस उजाडला तिचा त्या तरुणाला मेसेज आला ‘घरी ये. आज मी एकटी आहे.’ या विवाहित महिलेचे सासरचे लोक बाहेर गेले असल्याने तिने हा मेसेज केला होता. प्रेयसीचा हा मेसेज पाहून उत्साही तरुण स्वप्न रंगवत महिलेच्या सासरी जाऊन धडकला. पहिल्यांदाच ते दोघे एकमेकांना भेटणार होते. त्यामुळे दोघेही उत्सुक होते. तो आला आणि तिने दार लावून घेतले. पण कुठून काय सासरच्या लोकांना या घटनेची चाहुल लागली आणि ते घरी पोहोचले.  (instagram befriending married woman and her lover were caught red handed by the in laws video viral trending news in google today)

मग काय त्यांनी त्या दोघांना रंगेहात पकडलं. सासरच्या मंडळीने त्या तरुणाचे हात पाय बांधले आणि प्रश्नांचा भडिमार केला. तुला कोणी बोलवलं, या घराचा पत्ता कोणी दिली? अशी एकावर एक प्रश्नांचा सपाटा सुरु होता. या घटनेचा व्हिडीओ (viral video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाला आहे.  

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकतो तो त्या लोकांना सांगत आहे. ”या महिलेला मी माझ्यासोबत ठेवेन आणि तिच्याशी लग्नही करेल,”  असं तो गयावया करत सांगत आहे. या सासरच्या लोकांनी त्याचा कुटुंबाचा शोध लावून त्यांच्याशी संपर्क केला आणि मुलाचा प्रताप सांगितला. 

ही घटना राजस्थान भिलवाडा जिल्ह्यातील एका गावातील आहे. पुढे सासरच्या लोकांनी हे प्रकरण पंचायती समोर ठेवले. पंचायतीने या दोघांसोबत प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. अखेर अनेक तासांनी पंचायतीने निर्णय घेतला. पंचायतीच्या निर्णयानुसार शिक्षा म्हणून या दोघांचे लग्न लावण्यात आले.  महिलेचं पहिलं लग्न झालं असलं तरी पंचायतीच्या निर्णयानुसार तिचं या तरुणाशी दुसरं लग्न लावण्यात आलं. 

 

Related posts