पोलीस कर्मचाऱ्यावर पाठलाग करुन हल्ला, बेशुद्धावस्थेत असताना अंगावर उड्या: CCTV त धक्कादायक घटना कैद

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Crime News: कर्नाटकातील (Karnataka) हस्सन जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. कर्तव्यावर नसणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर अत्यंत निर्घृपणणे हल्ला करण्यात आला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलीस कर्मचारी दोन गटातील भांडणं सोडवण्यासाठी गेला असता त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस कर्मचारी बेशुद्ध होऊन खाली जमिनीवर पडलेला असताना, आरोपींनी त्याच्या शरिरावर उड्या मारल्या. गेल्या काही दिवसांत पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याची ही दुसरी घटना आहे. याआधी कलबुर्गी येथे एका पोलीस कर्मचाऱ्यावर अंगावर ट्रक घालून हत्या करण्यात आली होती. 

शरथ असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. शरथ होलेनरसीपुरा शहरात आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पार्टीत गेले होते. यावेळी भांडण झालं असता शरथ यांनी त्यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण यानंतर त्यांच्यावरच हल्ला करण्यात आला.

आरोपींच्या टोळीने शरथ यांच्यावर हल्ला केला आणि आणि पार्टी हॉलपर्यंत त्यांचा पाठलाग केला. यानंतर पुन्हा त्यांना निर्घृणपणे मारहाण करण्यात आली. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे त्यानुसार, आरोपी शरथ यांना मारहाण करत असल्याचं दिसत आहे. त्यांच्यावर दगडानेही हल्ला करण्यात आला. हातातील शस्त्रं ते हवेत भिरकावत होते. याशिवाय प्लास्टिक खुर्चीनेही त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. आरोपी इतक्यावरच थांबले नाहीत. हल्ल्यानंतर शरथ बेशुद्ध अवस्थेत पडलेले असताना आरोपींनी त्यांच्या शरिरावर उड्या मारल्या.

यानंतर शरथ यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गेल्या काही दिवसांत पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याची ही दुसरी घटना आहे. याआधी कलबुर्गी येथे एका पोलीस कर्मचाऱ्यावर अंगावर ट्रक घालून हत्या करण्यात आली होती. 

कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील जेवरगी तालुक्यातील नारायणपुरा गावाजवळ वाळू माफियांनी कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस हवालदाराची चिरडून हत्या केल्याचा आरोप आहे. बेकायदेशीर उत्खननानंतर वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकला थांबवण्याचा प्रयत्न नेलोगी पोलीस ठाण्यातील 51 वर्षीय हवालदार मयुरा करत असताना गुरुवारी ही घटना घडली. त्यानंतर ट्रक चालकाने पोलीस कर्मचाऱ्याला चिरडले. पोलिसांनी आरोपी सिद्धण्णा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

चौकशीत सिद्दण्णाने गुन्ह्याची कबुली दिली. चालकाने सांगितले की, कॉन्स्टेबलने त्याला अवैधरित्या वाळू वाहून नेण्यास थांबवले तेव्हा त्याने कार त्याच्यावर चढवली. कलबुर्गी एसपी ईशा पंत यांनी सांगितले की, वाळूचा साठा एका खाजगी व्यक्तीचा आहे. काही वाळू पीडब्ल्यूडीचीही आहे. अवैध वाळू उत्खननात गुंतलेल्या लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हवालदार गस्तीवर होते. यावेळी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाने हवालदाराला चिरडून ठार केले.

 

Related posts