‘संसदेत ते दोघं उड्या मारत होते, तसंच….’, अधीर रंजन चौधरी यांनी सांगितलं नेमकं काय झालं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) लोकसभेतील कामकाजादरम्यान सुरक्षेतील मोठी त्रूट समोर आली आहे. सभागृहाचं कामकाज सुरु असतानाच 2 तरुणांनी खासदारांच्या बाकांवर उडी मारली. लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सभागृहात नेमकं काय घडलं हे सविस्तरपणे सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं की, दोन तरुणांनी कामकाज सुरु असतानाच उड्या मारल्या. यानंतर आमच्या सहकाऱ्यांनी त्यांना पकडलं. त्यावेळी कोणताही सुरक्षा कर्मचारी तिथे उपस्थित नव्हता. खासदारांनीच त्या तरुणांना पकडलं.   #WATCH | Delhi: Two protestors, a man and a woman have been detained by Police in front of Transport Bhawan who were protesting with colour smoke.…

Read More

सोन्यावर भारतीयांच्या उड्या! धनत्रयोदशीला विकले गेले 41 टन सोनं; एकूण किंमत…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhanteras 2023 : धनत्रयोदशीपासून (Dhanteras) सुरू झालेल्या पाच दिवसीय दीपोत्सवाचा सण आणि बाजारपेठेत उत्साह आहे. धनत्रयोदशीला बाजारपेठांमध्ये एकच झुंबड उडाली होती. विशेषत: सोन्या-चांदीचे शोरूम (gold silver sales) आणि भांडी बाजारात खरेदीदारांची मोठी गर्दी होती. शुभ दिवस पाहून ग्राहकांनी बाजारपेठेत जाऊन आपल्या क्षमतेनुसार खरेदी केली. धनत्रयोदशीनिमित्त देशभरातील सराफा बाजारांमध्ये शुक्रवारी तब्बल 30 हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. देशभरात 27 हजार कोटी सोन्याची आणि 3 हजार कोटी रुपयांची चांदीची उलाढाल झाली आहे. या धनत्रयोदशीला देशभरात ग्राहकांनी सुमारे 41 टन सोने आणि 400 टन चांदीची खरेदी केली…

Read More

पातालकोट एक्स्प्रेसला भीषण आग, 2 कोच जळून खाक; प्रवाशांनी खिडकीतून मारल्या उड्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) आग्र्याजवळ पातालकोट एक्स्प्रेसला आग लागली आहे. आग लागल्यानंतर प्रवाशांमध्ये भीतीपोटी खळबळ माजली होती. काही लोकांनी यावेळी ट्रेनमधून उड्या मारुन जीव वाचवला.   

Read More

पोलीस कर्मचाऱ्यावर पाठलाग करुन हल्ला, बेशुद्धावस्थेत असताना अंगावर उड्या: CCTV त धक्कादायक घटना कैद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: कर्नाटकातील (Karnataka) हस्सन जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. कर्तव्यावर नसणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर अत्यंत निर्घृपणणे हल्ला करण्यात आला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलीस कर्मचारी दोन गटातील भांडणं सोडवण्यासाठी गेला असता त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस कर्मचारी बेशुद्ध होऊन खाली जमिनीवर पडलेला असताना, आरोपींनी त्याच्या शरिरावर उड्या मारल्या. गेल्या काही दिवसांत पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याची ही दुसरी घटना आहे. याआधी कलबुर्गी येथे एका पोलीस कर्मचाऱ्यावर अंगावर ट्रक घालून हत्या करण्यात आली होती.  शरथ असं या पोलीस…

Read More

कोचिंग सेंटरला आग, खिडकीतून विद्यार्थ्यांच्या उड्या; काहीजण वायरला लटकत उरतले; थरकाप उडवणारा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्लीमधील (Delhi) मुखर्जी नगरमध्ये (Mukherjee Nagar) एका इमारतीला आग लागली. ज्ञाना असं या इमारतीचं नाव असून त्यात अनेक कोचिंग सेंटर्स आहेत. इमारतीत आग लागल्यानंतर सगळीकडे एकच धावपळ सुरु झाली होती. यानंतर जीव वाचवण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी खिडकीतून उड्या मारल्या. यामुळे 4 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 11 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.  मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दिल्ली युनिव्हर्सिटी परिसराजवळ 12 वाजता आग लागली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत आग लागल्यानंतर नेमकी किती भयानक स्थित होती हे दिसत आहे. काही विद्यार्थी जीव…

Read More