मैत्रिणीसोबत सात फेरे घ्यायचे होते, ‘ती’ लिंग बदलण्यासाठी तांत्रिकाकडे गेली आणि घडलं भयंकर…, Girl went to Tantrik for become boy gender change want marriage with girl at shahjahanpur in uttar pradesh

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Crime News : दोघींची घनिष्ठ मैत्री होती. मात्र या मैत्रीचे प्रेमात कधी रुपांतर झाले ते दोघींनाही समजले नाही. त्यानंतर दोघींमध्ये असे संबंध निर्माण झाले की त्या दोघी एकमेकींशिवाय राहू शकत नव्हत्या. त्यांच्यात समलैंगिक संबंध होते. तिला आपल्या मैत्रिणीसोबत राहयचे होते आणि त्यासाठी तिला लग्न करायचे होते. आपल्या मैत्रिणीबरोबर सात फेरे घ्यायचे होते म्हणून ‘ती’ लिंग बदलण्यासाठी तांत्रिकाकडे गेली आणि इथेच तिचा गेम झाला.

उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूरमध्ये एक मुलगी तिच्या मैत्रिणीशी लग्न करण्यासाठी लिंग बदलासाठी तांत्रिकाकडे गेली. यादरम्यान तांत्रिकाने तिची हत्या केली. मुलगी गायब झाल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली होती. तपास करताना लखीमपूरच्या मोहम्मदी तहसीलमधून मुलीचा सांगाडा सापडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तांत्रिक आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे.

दोन महिन्यांपासून मुलगी बेपत्ता

दोन महिन्यांपूर्वी नातेवाईकांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी तक्रारीनंतर शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली. आता मुलीचा सांगाडा सापडल्यानंतर पोलिसांनी तपास करत तांत्रिक आणि मुलीच्या मैत्रिणीला अटक केली आहे. या घटनेने पोलिसांनाही धक्का बसला.

उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये एका मुलीचे तिच्या मैत्रिणीसोबत समलैंगिक संबंध होते. तिला तिच्याशी लग्न करायचे होतं. ती लिंग बदलण्यासाठी (मुलगा होण्यासाठी) तांत्रिकाकडे गेली. धक्कादायक बाब म्हणजे तांत्रिकाने मुलीची हत्या केली. याचा थांगपत्ता लागला नाही. मुलगी गायब झाली होती. दोन महिन्यांपूर्वी नातेवाईकांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर तपासाची सुत्रे हलली. 

मुलीचा सांगाडा सापडला आणि…

आरसी मिशन परिसरात राहणारी पूनम 18 एप्रिल रोजी घरातून बेपत्ता झाली होती. 26 एप्रिल रोजी त्याच्या भावाने हरवल्याची तक्रार पोलिसात दिली होती. तपासादरम्यान पोलिसांना काही माहिती मिळाली. हत्या झालेला मुलीला तिची मैत्रीण प्रीती हिच्याशी लग्न करायचे होते. पण मुलगी असल्याने अडचण निर्माण झाली होती. मात्र, दोघींच्यात समलैंगिक संबंध होते. त्यानंतर त्या मुलीने लिंग बदलण्याचा निर्णय घेतला आणि तांत्रिकाकडे गेली. यानंतर, रविवारी, 18 मे रोजी लखीमपूरच्या तहसील मोहम्मदी येथून एका मुलीचा सांगाडा सापडला. पोलिसांनी तपास केला असता हा सांगाडा पूनमचा असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघींमध्ये समलैंगिक संबंध होते, तिला लग्न करायचं होते. दरम्यान, त्यांच्याती संबंधामुळे प्रीतीचे लग्न मोडले होते. यानंतर प्रीतीची आई उर्मिलाने लखीमपूर खेरी येथील मोहम्मदी तहसीलमधील रहिवासी रामनिवास यांच्याशी संपर्क साधला. रामनिवास हा व्यवसायाने गवंडी आहे, पण तो तांत्रिकाचे काम करतो हे माहित होते. पूनमचा प्रीतीच्या मार्गातून बाजुला करण्यासाठी रामनिवासला दीड लाख रुपये देण्याचे ठरले होते. 

प्रीती आणि पूनमला जवळच्या जंगलात रामनिवासने याने बोलावून घेतले. तुमचे लग्न लावून देणार असे दोघींना सांगितले. त्याआधी तंत्रविद्येने मी तुला मुलीतून मुलगा बनवतो, असे त्याने पूनमला सांगितले. यानंतर रामनिवासने पूनमला पुन्हा जंगलात बोलावले, तेथे त्याने पूनमवर तंत्रमंत्र केले आणि संधी मिळताच तिच्यावर तिची हत्या केली. यानंतर मृतदेह जंगलातील झुडपात लपवून ठेवला. दरम्यान, पूनमचा भाऊ परमिंदर याने पूनमचे ​​कपडे पाहून ओळख पटवली.  त्यानंतर पोलिसांनी रामनिवास, प्रीती आणि तिची आई यांनी आपल्या बहिणीची हत्या केल्याचा आरोप परविंदरने केला आहे. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. 

Related posts