‘ही’ वनस्पती आरोग्यासाठीही फायदेशीर, याची पाने रोगांचा कर्दनकाळ, What Are The Benefits Of Parijat Plant, Can Parijat Leaves Cure Rheumatoid Arthritis in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Benefits of Parijat Leaves : आपल्या भारतीय संस्कृतीत पारिजात वनस्पती अत्यंत पवित्र मानली जाते, तिच्या फुलांमधून चांगला सुगंध येतो. पारिजातच्या फुलांचा उपयोग देवपूजेसाठी होतो. दिवसाऐवजी रात्री फुलून त्याचा सुगंध पसरतो. म्हणूनच तिला ‘रात की रानी’ किंवा रात्रीच्या फुलांची चमेली असेही म्हणतात. तुम्हाला माहीत आहे का की, या वनस्पतीच्या पानांमुळे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. अधिक जाणून घ्या.

पारिजात पानांचे फायदे

1. रोगप्रतिकारशक्ती वाढीला मदत
आता पावसाळा सुरु झाला आहे. हवामानातील बदल झाला आहे. हवामानातील बदलामुळे अनेकदा व्हायरल इन्फेक्शनचा धोका वाढतो ज्यामुळे सर्दी-खोकला आणि सर्दी सामान्य असते. हे टाळण्यासाठी पारिजातची सुमारे 10 पाने घ्या आणि एका ग्लास पाण्यात मिसळून ठेवा. आणि हे मिश्रण तासभर तसेच ठेवा. त्यानंतर ते पाणी प्या. त्यामुळे तुम्हाला चांगला आराम पडतो.

2. संधिवातावर लाभदायक
पारिजातची पाने गुणकारी आहेत. वाढत्या वयाबरोबर संधिवात होणे सामान्य गोष्ट आहे, परंतु आजकाल तरुणांनाही या समस्येचा सामना करावा लागत आहे. अशावेळी पारिजातच्या पानांमधून आवश्यक तेल काढा आणि त्यात खोबरेल तेलाचे काही थेंब टाका. हे तेल दुखणाऱ्या भागात लावा. त्यामुळे तुम्हाला आराम मिळतो.

3. डायबिटीजसाठी गुणकारी
डायबिटीज अर्थात मधुमेह रुग्णांना नेहमीच आरोग्याची काळजी  घ्यावी लागते. अशा परिस्थितीत तुम्ही पारिजातच्या पानांची मदत घेऊ शकता. पारिजातच्या पानांमध्ये मधुमेह विरोधी गुणधर्म असतात. जे तुमची हाय शुगर ( साखरेची पातळी) नियंत्रित करण्यास मदत करतात. मात्र, हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणे आवश्यक आहे.

4. केस दाट आणि चमकदार होतात
आज अनेक क्षेत्रात स्पर्धा आहे. अनेक कार्यालयात तणाव दिसून येतो. सध्याच्या युगात अवेळी आहार घेणे, प्रदूषण आणि रसायनांवर आधारित केस उत्पादनांच्या वापरामुळे, बहुतेक लोकांना केसांशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. ज्यामध्ये केस कमकुवत होणे, केस पांढरे होणे आणि केस गळणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. पारिजाताच्या पानांपासून बनवलेला काढा प्यायल्यास केस काळे, दाट आणि चमकदार होतात.

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

 

Related posts