Cracking Knuckles Isn’t Good Or Bad For You May Affect Arthritis Fact Check; बोटं मोडण्याची सवय ठरू शकते घातक? सांधेदुखी होते की नाही, तज्ज्ञांकडून खुलासा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बोटं मोडल्याने नक्की काय होतं

बोटं मोडल्याने नक्की काय होतं

डॉ. मनन यांच्या सांगण्याप्रमाणे आपल्या बोटांमध्ये सांधे असतात, जे जोडलेले असतात आणि त्यामध्ये सायनोवियल फ्लुईड असते. हे फ्लुईड जॉईंट्सवर ल्युब्रिकंट्सचे काम करते. या फ्लुईडमध्ये नैसर्गिक स्वरूपात बुडबुडे निर्माण होतात. जेव्हा तुम्ही बोटं मोडता अथवा बोटं खेचता तेव्हा एक नेगेटिव्ह प्रेशर तयार होते आणि सांध्यातील असलेले फ्लुईड्सचे बुडबुडे फुटतात ज्याचा कटकन आवाज येतो.

सांध्यावर काय होतो परिणाम

सांध्यावर काय होतो परिणाम

हे बुडबुडे फुटण्याचा सांध्यावर काय परिणाम होतो याचे उत्तर देताना डॉ. मनन यांनी सांगितले की, तुम्ही जितके वेळा बोटं मोडता, त्याचा शरीर वा हाडांवर कोणताही परिणाम होत नाही. इतकंच नाही तर सांधेदुखी अथवा आर्थरायटिस यामुळे होत नाही. यामुळे बोटं ना फुगत ना जाड होत. त्यामुळे तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही बोटं मोडू शकता.

(वाचा – पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्र्याच्या मुलीने घेतला Gender बदलण्याचा निर्णय, कशी असते प्रक्रिया)

चांगली की वाईट सवय

चांगली की वाईट सवय

बोटं मोडण्याची सवय ना चांगली आहे ना वाईट. अनेकांना असं वाटतं की बोटं सतत मोडण्याच्या सवयीमुळे ताप येतो अथवा सांधेदुखी होते. मात्र असं अजिबात नाही. बोटं मोडल्याने अशा कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागत नाही असं डॉ. मनन यांनी आपल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितले आहे. असा कोणताही वैज्ञानिक दावा करण्यात आलेला नाही.

(वाचा – अत्यंत कठीण होता ‘बालिका वधू’ फेम अविका गोरचा Weight Loss प्रवास, २० किलो वजन घटवले)

सांधेदुखीशी संबंध आहे का?

सांधेदुखीशी संबंध आहे का?

बोटं मोडल्याने सांध्याच्या आसपास असणाऱ्या मसल्सना आराम मिळतो आणि त्यामुळे अनेक जणांना ही सवय असते. काही हेल्थ स्टडीनुसार जेव्हा सतत बोटं मोडली जातात, तेव्हा त्याचा लिगामेंट्च्या सिक्रिएशनवर परिणाम होतो. हाडांमध्ये सतत रगडले गेल्याने सांधेदुखी होऊ शकते असा अंदाज बांधला जातो. मात्र डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे सांधेदुखीचा आणि बोटं मोडण्याचा काहीही संबंध नाही.

(वाचा – मासिक पाळीतील पोटदुखीचा त्रास होईल १० मिनिट्समध्ये बंद, ३ वनस्पती करतील चमत्कार)

[ad_2]

Related posts