( प्रगत भारत । pragatbharat.com)
Punjab and Sind Bank Recruitment 2023 Notification: पंजाब आणि सिंध बँकेत विविध पदांची भरती केली जाणार आहे. बॅंकेच्या अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या पदभरतीअंतर्गत 183 विशेषज्ञ अधिकारीच्या जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी नोंदणी प्रक्रिया 28 जून 2023 रोजी सुरू झाली आहे.
पंजाब आणि सिंध बँक पदभरतीअंतर्गत लॉ मॅनेजर, आयटी अधिकारी, राजभाषा अधिकारी, विदेशी मुद्रा अधिकारी आणि इतर अशी एकूण 183 विशेषज्ञ अधिकारी पदे भरली जाणार आहेत.
इंजिनीअरिंग डिग्री/ PG डिग्री/ कायद्यातील बॅचलर पदवी/ CA/ MCA/ B.Tech/ BE/ B.Sc/ MBA/ Diploma यासह काही शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
महाराष्ट्रात छत्रपती संभाजी नगर, औरंगाबाद, मुंबई/ठाणे/नवी मुंबई/एमएमआर, नागपूर आणि पुणे येथे ही भरती केली जाणार आहे.
पंजाब आणि सिंध बँक SO रिक्त जागांचा तपशील
राजभाषा अधिकारी-2
आयटी अधिकारी-24
तांत्रिक अधिकारी-सिव्हिल-1
रिलेशनशिप मॅनेजर-17
चार्टर्ड अकाउंटंट-30
कायदा व्यवस्थापक-6
सॉफ्टवेअर डेव्हलपर-20
जोखीम व्यवस्थापक-5
फॉरेक्स डीलर-2
डिजिटल व्यवस्थापक-2
सुरक्षा अधिकारी-11
राजभाषा अधिकारी-5
कायदा व्यवस्थापक-1
ट्रेझरी विक्रेता-2
परकीय चलन अधिकारी-2
आयटी व्यवस्थापक-40
डिजिटल व्यवस्थापक-2
परकीय चलन अधिकारी-6
अर्थशास्त्रज्ञ अधिकारी-2
चार्टर्ड अकाउंटंट-3
शैक्षणिक पात्रता
IT अधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थेतून कॉम्प्युटर सायन्स/ IT/ ECE/ MCA मध्ये इंजिनीअरिंग पदवीधर. त
निवड प्रक्रिया
लेखन चाचणी, शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी 12 जुलै 2023 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 25 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 35 वर्षे असावे.
राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमानुसार वयोमर्यादेत 10 वर्षांपर्यंत सवलत दिली जाणार आहे.
या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 78230 रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.
12 जुलै 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या.