[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
दातदुखीसाठी
Alum For Toothache: काही वेळा अचानक दातदुखी सुरू होते आणि रात्रीच्या वेळी ही दातदुखी सुरू झाली तर थांबवणे कठीण वाटते आणि या कळा सहन करणेही कठीण आहे. अशावेळी तुरटीच्या पावडरचा उपयोग करणे सोपे ठरते. जो दात दुखत आहे, त्यावर तुरटीची पावडर रगडल्याने काही वेळातच दातदुखी बंद होते.
हा घरगुती उपाय तुम्ही नक्की करून पाहा. बॅक्टेरियाची वाढ थांबविण्यासाठी तुरटी मदत करते. त्यामुळे त्वरीत दातदुखी थांबविण्यास मदत मिळते.
तोंडाच्या दुर्गंधीवर तुरटीचा उपयोग
तोंडातून येणारी दुर्गंधी ही अनेकदा शरमेने मान खाली घालायला लावणारी ठरते. पण तुरटीच्या वापराने यावर तुम्ही उपाय करू शकता. रोज ब्रश केल्यानंतर तुम्ही चूळ भरताना जे पाणी वापरता त्यात तुरटी मिक्स करा. तुरटीच्या या पाण्याने तुम्ही रोज जर चूळ भरली तर काही दिवसातच तोंडाला येणाऱ्या दुर्गंधीपासून तुम्हाला सुटका मिळते.
(वाचा – २०० किलो वजन असणाऱ्या कोरिओग्राफर गणेश आचार्यने कसे केले ९८ किलो वजन कमी, प्रवास आहे प्रेरणादायी)
नैसर्गिक माऊथवॉश
तुरटी पाण्यात फिरवून हे पाणी एका बाटलीत भरून ठेवा. रोज हे पाणी माऊथवॉशप्रमाणे वापरा. दातांना बॅक्टेरिया फ्री ठेवण्यासाठी आणि दातांच्या हिरड्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी याचा अधिक वापर करता येऊ शकतो.
(वाचा – जेवल्यानंतर का खावी बडिशेप खडीसाखर, ५ आरोग्यदायी फायदे)
तोंड येण्यापासून सुटका
अनेकदा उष्णतेमुळे तोंड येण्यासारखे आजार त्रास देतात. वेळीच लक्ष न दिल्यास, याची मोठी जखमही होते. या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी तुरटीची पावडर तोंड आलेल्या ठिकाणी तुम्ही लावावी. काही दिवस सतत ही पावडर तोंडाला लावली तर तोंडाला आलेले फोड निघून जाण्यास मदत मिळते.
(वाचा – गव्हाचे नाही तर वजन कमी करण्यासाठी हे पीठ ठरते अधिक उपयुक्त, महिनाभरात होईल झर्रकन Weight Loss)
हिरड्यांमधून रक्त येत असल्यास
हिरड्यांमधून रक्त येणे हे साधारणतः पायरियाचे लक्षण आहे. यावर तुरटी उपयुक्त ठरते. १ ग्लास गरम पाण्यात तुरटी मिक्स करा आणि त्यात सैंधव मीठ घाला. या पाण्याने दिवसभरात ३-४ वेळा चूळ भरा. हिरड्यांमधील रक्त येण्यापासून तुमची सुटका होईल.
पिवळ्या दातांवरील उपाय
दात कितीही वेळा ब्रश केल्यानंतरही पिवळे राहात असतील तर घरगुती उपाय म्हणून तुम्ही तुरटीचा वापर करावा. तुरटीच्या पावडरमध्ये सैंधव मीठ मिक्स करा. त्यात मोहरीचे तेल मिक्स करून पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट दातावर घासा. दिवसातून २ वेळा या पेस्टने दात घातल्यास, दातावरील पिवळटपणा निघून जाण्यास मदत मिळते.
संदर्भ
https://www.jpsr.pharmainfo.in/Documents/Volumes/vol11issue03/jpsr11031977.pdf
https://www.1mg.com/ayurveda/alum-143?wpsrc=Google+Organic+Search
https://pharmeasy.in/blog/ayurveda-uses-benefits-side-effects-of-alum/
[ad_2]