( प्रगत भारत । pragatbharat.com)
Rahul Gandhi Answers When Will You Marry Question: काँग्रेसचे नेते आणि निलंबित खासदार राहुल गांधींनी (Rahul Gandhi) मागील काही आठवड्यांपासून सर्वसामान्यांबरोबर संवाद साधण्यासाठी एक अनोखी मोहिम हाती घेतली आहे. कधी शेतकऱ्यांची तर कधी ट्रक चालकांची भेट घेणारे राहुल गांधी काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीमधील मोटरसायकल दुरुस्त करणाऱ्या मेकॅनिक्सलाही भेटले. याच भेटीसंदर्भातील व्हिडीओ राहुल गांधींनी नुकताच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी एका बाजारपेठेमधील या दुचाकीच्या गॅरेजमध्ये प्रवेश करण्यापासून ते पान्हा हातात घेऊन गाडी ठिक करण्यापर्यंत अनेक दृष्य दिसत आहेत. मी तुमच्याकडे शिकण्यासाठी आलो आहे असं राहुल या कामगारांना सांगतात. या कामगारांबरोबरच्या अनुभवाचा एक छोटा टिझर प्रकारातील व्हिडीओ राहुल यांनी शेअर केला आहे. “भारताचा सुपर मेकॅनिक ज्याच्या पान्ह्याने देशाच्या प्रगतीची चाकं धावतात,” अशा कॅप्शन अंतर्गत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
…म्हणून मेकॅनिक्सला सशक्त करणं आवश्यक
“‘भारत जोडो’चा पुढील टप्पा करोल बागमधील गल्यांमध्ये… येथे बाईक मार्केटमध्ये उमेद शाह, विक्की सेन आणि मनोज पासवान यांच्याबरोबर सर्व्हिसिंग आणि मेकॅनिकल कामाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. भारताच्या ऑटोमोबाइल उद्योगाला अधिक सक्षम करण्यासाठी भारतीय मेकॅनिक्सला सशक्त करणं आवश्यक आहे,” असंही राहुल गांधींनी हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
यही हाथ हिंदुस्तान बनाते हैं
इन कपड़ों पर लगी कालिख
हमारी ख़ुद्दारी और शान है
ऐसे हाथों को हौसला देने का काम
एक जननायक ही करता है
दिल्ली के करोल बाग में बाइक मैकेनिक्स के साथ श्री @RahulGandhi
‘भारत जोड़ो यात्रा’ जारी है… pic.twitter.com/0CeoHKxOan
— Congress (@INCIndia) June 27, 2023
मेकॅनिकने विचारलं, लग्न कधी करणार?
करोल बागमध्ये बाईक सर्व्हिसिंग करणाऱ्या एका मेकॅनिकने राहुल गांधींना थेट त्यांच्या लग्नासंदर्भात प्रश्न विचारला. ‘तुम्ही लग्न कधी करणार?’ असा प्रश्न एका मेकॅनिकने बाईक दुरुस्त करता करता राहुल गांधींना विचारला. यावर राहुल गांधींनी “लवकरच होईल,” असं हसतच उत्तर दिलं. यानंतर राहुल गांधींनी या मेकॅनिकला, “तुझं लग्न झालं का?” असा प्रश्न विचारला. त्यावर या मेकॅनिकने, “वडिलांनी मुलगी पाहण्यासाठी सांगितलं आहे. सध्या पगार कमी आहे. महिन्याचे 14 ते 15 हजार कमवतो. एवढ्यात घर आणि कुटुंब कसं चालवायचं असा प्रश्न आहे,” असं उत्तर राहुल गांधींना दिलं. यावर अन्य एका मेकॅनिकने, “लग्न हा ज्याचा त्याचा खासगी प्रश्न असतो. करायचं असेल तर करावं नाहीतर करु नये,” असं मत व्यक्त केलं.
भारत के सुपर मैकेनिक – जिनके पाने से देश की तरक्की का पहिया चलता है!
भारत जोड़ो का नया पड़ाव, करोल बाग़ की गलियां – जहां बाइकर्स मार्केट में, उमेद शाह, विक्की सेन और मनोज पासवान के साथ बाइक की सर्विसिंग की और मैकेनिक के काम को गहराई से समझा।
भारत के ऑटोमोबाइल उद्योग को मज़बूत… pic.twitter.com/Q5QwHgC2Fj
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 9, 2023
राहुल यांना पाहण्यासाठी गर्दी
राहुल गांधींच्या या करोल बाग दौऱ्यादरम्यान अनेकांनी त्यांच्या भेटण्यासाठी, त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी गर्दी केल्याचंही व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हा केवळ टीझर असून पूर्ण व्हिडीओ राहुल गांधींच्या युट्यूब अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे.