[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
आहारात या पदार्थांचा समावेश करा
सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट कमी असलेल्या गोष्टी खाणे टाळा. प्रक्रिया केलेले अन्न, तळलेले अन्न, मांस, चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ यांसारखे कोलेस्टेरॉल वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन कमी करा. मेडीलाइन प्लसच्या रिपोर्टनुसार, फळे, भाज्या, कडधान्ये, प्रथिने (जसे की पोल्ट्री आणि मासे), आणि हेल्दी फॅट (जसे की ऑलिव्ह ऑईल, एव्होकॅडो आणि नट्स) यांचा आहारात मोठ्या प्रमाणावर समावेश करावा.
(वाचा :- Protein Food : श्रावणात चिकन-अंडी निश्चिंतपणे सोडा, हे 5 देसी पदार्थ नॉनव्हेजच्या तोडीस तोड चव व प्रोटीन देतील)
व्यायाम आवर्जून करा
व्यायामामुळे एचडीएल कोलेस्टेरॉल अर्थात चांगले कोलेस्टेरॉल वाढण्यास मदत होते, तसेच एलडीएल कोलेस्ट्रॉल अर्थात वाईट कोलेस्टेरॉल कमी होते. कार्डिओ/एरोबिक एक्सरसाईज जसे की वेगाने चालणे, जॉगिंग, सायकल चालवणे, पोहणे किंवा कोणतीही शारीरिक क्रिया हृदयाची गती वाढवते. आठवड्यातून किमान 150 मिनिटे मध्यम एक्सरसाईजचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.
(वाचा :- Kidney Stone Dissolving Food: किडनीत साचलेल्या मुतखड्यांचे झटक्यात पाणी करतात हे 6 पदार्थ, किडनी होते पूर्ण साफ)
वजन नियंत्रणात ठेवा
जास्त वजन असलेल्या लोकांना उच्च कोलेस्ट्रॉल आणि हृदयाच्या समस्यांचा धोका जास्त असतो. त्यामुळे वजन कमी करणे, विशेषतः पोटाची चरबी कमी केल्याने तुमचे कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होऊ शकते.
(वाचा :- या 10 हिरव्या भाज्या आहेत Diabetes च्या कट्टर दुश्मन, रक्तातील साखर टिचभरही वाढू देत नाहीत व मधुमेह करतात नष्ट)
तंबाखू आणि दारू पासून दूर राहा
धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांना नुकसान होते, ज्यामुळे खराब कोलेस्टेरॉल काढून टाकणे कठीण होते. यामुळे चांगले कोलेस्ट्रॉल देखील कमी होते. त्याचप्रमाणे, क्लीव्हलँड क्लिनिक यांच्या रिपोर्टनुसार, जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते.
(वाचा :- पिवळेधम्मक व काळे दात एका रात्रीत होतात मोत्यांसारखे पांढरेशुभ्र व मजबूत, घरातील ही एक साधी गोष्ट चमकवते बत्तीशी)
ताण-तणावापासून दूर राहा
दीर्घकाळ तणावाखाली राहिल्याने कोलेस्टेरॉलच्या पातळीवर परिणाम होतो. तणाव टाळण्यासाठी निरोगी मार्ग शोधा, जसे की दीर्घ श्वास घेणे, ध्यान करणे आणि योगासारख्या तंत्रांचा सराव करणे. याशिवाय तुमच्या आवडीचे काम करा आणि आवडत्या व्यक्तींसोबत वेळ घालवा. या सर्वांशिवाय, तुमची कोलेस्ट्रॉल पातळी तपासा आणि आवश्यक चाचण्या करत रहा.
(वाचा :- Weight Loss Story: 86 किलोच्या मुलीला लठ्ठ बोलून उडवायचे थट्टा, फक्त ही 1 ट्रिक वापरून घटवलं तब्बल 27 किलो वजन)
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.
[ad_2]