[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मधुमेह होतो म्हणजे नक्की काय?
डायबिटीस एक असा आजार आहे, ज्यामध्ये शरीरातील इन्सुलिन रजिस्टन्स निर्माण होतात अथवा इन्सुलिन तयार होणं बंद होतं. यामुळे शरारीत रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते आणि मधुमेह आजार होतो. मात्र हा आजार नियंत्रणात न राहिल्यास संपूर्ण शरीराला पोखरून टाकतो आणि यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. मधुमेह हा अत्यंत धोकादायक आजार आहे.
काय सांगतो शोध
ब्रिटीश वेबसाईट एक्स्प्रेसने दिलेल्या अहवालानुसार, डायबिटीस नियंत्रणात आणण्याचा सर्वात स्वस्त आणि सोपा उपाय म्हणजे कांदा. अमेरिकेत सॅन डिएगोमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एंडोक्राईन सोसायटीच्या वार्षिक सभेत याबाबत सांगण्यात आले. यामध्ये रिसर्च करणाऱ्यांनी सांगितले की, कांदा हा मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतो.
(वाचा – युरिक अॅसिड उच्च असणाऱ्यांनी चहा प्यावा की कॉफी, काय सांगतो अहवाल)
कांद्याच्या अर्काचे सेवन
शोध करणाऱ्यांद्वारे असे सांगण्यात आले की, शुगरच्या रूग्णांनी नियमित स्वरूपात आणि योग्य प्रमाणात कांद्याचा अर्क सेवन केल्यास, त्यांच्या रक्तातील साखर ५०% कमी होऊ शकते. तसंच कांद्याचे सेवन करणे हा डायबिटीसवरील सर्वात स्वस्त आणि सोपा उपायही सांगण्यात आला आहे. हा शोध उंदरांवर करण्यात आला. यातून आश्चर्यचकित करणारा शोध सापडला असल्याचेही सांगण्यात आले.
(वाचा – पावसाळ्यात भिजून सर्दी-खोकल्याने त्रस्त झालात, तर ५ सोपे घरगुती उपाय आजारांना पळवून लावतील)
कसा लावला शोध
रिसर्चमध्ये डायबिटीस असणाऱ्या उंदरांना २००, ४०० आणि ६०० मिलिग्रॅम कांद्याचा अर्क पाजण्यात आला. काही आठवड्यापर्यंत कांद्याचा रस पिण्याने उंदरांच्या शरीरातील ब्लड शुगर ३५ ते ५० टक्के कमी होईल. कांद्याचा अर्क पिण्यामुळे उंदरांचे वजनही मेंटेन राहिले. यावरून डायबिटीस नियंत्रणात आणण्यासह वजनही आटोक्यात राहण्यासाठी याचा उपयोग होतो असा अंदाज बांधण्यात आला.
डायबिटीस नियंत्रणात आणण्यासाठी
रक्तातील साखर कमी करण्यासाठी अर्थात मधुमेह आटोक्यात आणण्यासाठी हेल्दी लाइफस्टाईल, नियमित स्वरूपात चालणे अथवा व्यायाम, चांगले डाएट आणि योग्य उपचार याची अत्यंत आवश्यकता भासते. रक्तातील साखरेची पातळी दर महिन्यात तपासणे गरजेचे आहे.
तसंच शुगर असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे आणि डॉक्टर, डाएटिशियन यांचा सल्ला पाळणे आवश्यक आहे. तसंच वेळोवेळी तपासणी करून घेणेही गरजेचे आहे, हे लक्षात ठेवा.
[ad_2]