5 वेळा स्टार्टअप बुडाला; शेवटी अशी उभी केली 9800 कोटींची उलाढाल असलेली कंपनी

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Success Story : अपयश ही यशाची पहिली पायरी असते. अथक प्रयत्न करुनही यश मिळाले नाही की अनेक जण हार मानतात. तर, काही जण प्रयत्न सुरु ठेवतात. अशीच Success Story आहे ती   9800 कोटींची उलाढाल असलेल्या boAt कंपनीच्या मालकाची. 5 वेळा स्टार्टअप व्यवसाय बुडाला. पण हार मानली नाही. शेवटी यश मिळालेच. boAt सध्या एक जगप्रसिद्ध ब्रँडपैकी एक आहे.  अमन गुप्‍ता (Aman Gupta)  हे या कंपनीचे सह-संस्‍थापक आहेत.  

इयरफोन, हेडफोन, स्पीकर, ट्रॅव्हल चार्जर, होम स्पीकर ते स्मार्ट वॉच बनवणारी boAt कंपनी सध्या चांगलीच ट्रेंडिंगमध्ये आहे.   शार्क टँक इंडिया या रियालीटी शो चे जज अमन गुप्‍ता हे  boAt  कंपनीचे सह-संस्‍थापक आहेत.  boAt कंपनी जगभरातील नामांकित ब्रँडना टक्कर देत आहे.  2015 साली सुरू झालेल्या या कंपनीचे बाजारमूल्य आज 9800 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

5 वेळा स्टार्टअपमध्ये अपयश

boAt  कंपनीचे सह-संस्‍थापक अमन गुप्ता यांचा जन्म 1984 मध्ये दिल्लीत झाला. अमन गुप्ता हे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत. अमन यांनी दिल्ली पब्लिक स्कूलमधून शालेय शिक्षण आणि दिल्ली विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केले. नंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत गेले. केलॉग ग्रॅज्युएट स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. अमन यांनी चार्टर्ड अकाउंटंट व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. पण त्यांना या  व्यवसायात यायचे नव्हते. boAt कंपनी सुरू करण्यापूर्वी त्यांनी एकामागून एक पाच कंपन्या सुरू केल्या होता. परंतु एकही कंपनी चालली नाही.  

अशी यशस्वी झाली boAt  कंपनी

अमन यांना पाच वेळा स्टार्टअपमध्ये अपयश आले. 2015 मध्ये त्यांनी बोट कंपनीची स्थापना केली. व्यवसायापेक्षा त्यांनी जास्त प्रोडक्ट आणि टीमवर लक्ष केंद्रीत केले. तुमचं प्रोडक्ट चांगल असलं असे पाहिजे हे मी यातून शिकले आणि शेवटी यशस्वी  झालो असे अमन गुप्ता यांनी एका मुलाखतीत सांगितले. यामुळे प्रयत्न करत करा हार मानू नका यश नक्की मिळेल असे अमन गुप्ता म्हणाले.

अमन गुप्ता 700 कोटींच्या संपत्तीचे मालक

अमन गुप्ता 700 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत.  अमन गुप्ता पत्नी आणि दोन मुलांसह दिल्लीत राहतात. दक्षिण दिल्लीत त्यांचे अलिशान घर आहे. या घराची किंमत 8-10 कोटी रुपये आहे. अमन गुप्ता यांच्याकडे BMW X1 आणि BMW 7 सिरीजच्या कार आहेत. 

Related posts